Friday, August 7, 2020
Mumbai
27.5 C
घर लाईफस्टाईल मकरसंक्रांती स्पेशल : जाणून घ्या मकरसंक्रातीचा मूहूर्त आणि पूजेचा विधी

मकरसंक्रांती स्पेशल : जाणून घ्या मकरसंक्रातीचा मूहूर्त आणि पूजेचा विधी

जाणून घ्या मकरसंक्रातीचा मूहूर्त आणि पूजेचा विधी

Mumbai
makar sankranti 2020 : makar sankranti shubh muhurat snan date importance puja vidhi importance makar sankranti everything
मकरसंक्रातीचा मूहूर्त आणि पूजेचा विधी

येत्या १५ जानेवारीला मकरसंक्रांती आली असून या सणासाठी घराघरातील सर्वच गृहिणी तिळगुळाचे लाडू बनवण्यात व्यस्त झाल्या आहेत. तर काही महिला हळदीकुंकवाचे सामान घेण्यात मग्न झाल्या आहेत. बऱ्याचदा मकरसंक्रांतीची संपूर्ण तयारी झालेली असते. पण, त्या संक्रांतीचा शुभ मुहूर्त माहिती नसतो. त्यासोबतच काय विधी करावी हे देखील माहित नसते. चला तर जाणून घेऊया. मकरसंक्रातीचा मूहूर्त आणि पूजेचा विधी.

मकरसंक्रांतीचा मुहूर्त

यंदाचा संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा बुधवार १५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून सकाळी ९ वाजेपर्यंत आहे.

पूजेचा विधी

makar sankranti 2020 : makar sankranti shubh muhurat snan date importance puja vidhi importance makar sankranti everything

मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुवासिनी महिला सुगड्यांची पूजा करतात. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते. यानंतर गृहिणी एकमेकिंना वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. तसेच या पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणले जातात. या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरे टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. त्यानंतर तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण म्हणून संबोधले जाते.


हेही वाचा – मकरसंक्रात स्पेशल : तिळगुळ खा, आरोग्य सुदृढ ठेवा!