घरताज्या घडामोडीमकरसंक्रांत स्पेशल : संक्रांतीला करा गोडाचे पदार्थ

मकरसंक्रांत स्पेशल : संक्रांतीला करा गोडाचे पदार्थ

Subscribe

मकरसंक्रांतीला करा गोडाचे पदार्थ

मकरसंक्रातीला तिळाचे लाडू हे केलेच जातात. मात्र, अनेकांना दरवर्षी तिळाचे लाडू करुन फार कंटाळा येतो, अशावेळी काहीतरी वेगळे करावे, असे वारंवार वाटते. परंतु, काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. अशावेळी तुम्ही तीळ गुळाची पोळी, कडाकणी आणि कुरमुऱ्याचे लाडू नक्की ट्राय करु शकता. चला जाणून घ्या. मकरसंक्रांत स्पेशल रेसिपी.

तीळ गुळाची पोळी

- Advertisement -

साहित्य, कव्हरसाठी :

मैदा १ वाटी
कणिक १ वाटी
मीठ चिमूटभर
तेल २ टी स्पून
गरजेनुसार पाणी

- Advertisement -

सारणासाठी :

तीळ १५० ग्रॅम, गूळ १५० ग्रॅम, सुके खोबरे कीस ३ टेबल स्पून, शेंगदाण्याचे कूट २ टेबल स्पून, खसखस १ टी स्पून, वेलची पूड १ टी स्पून, साजूक तूप १ टी स्पून सारणासाठी आणि वरून लावण्यासाठी आवश्यकतेनुसार

कृती :

प्रथम कव्हरसाठीच्या साहित्यातून नेहमीच्या पुरीपेक्षा थोडे नरम पिठ मळून १५ मिनिटे झाकून ठेवावे. सारणासाठी तीळ, खोबरे, खसखस वेगवेगळे भाजून, याची मिक्सरमधून पूड करून घ्यावी. त्यात भाजलेल्या दाण्याचे कूट आणखी दळून पावडर करून घ्यावे. मग बाऊलमध्ये काढून त्यात वेलची पूड मिसळून १ टी स्पून साजूक तूपाच्या साहाय्याने सर्व मिश्रण एकत्र करून सारणाचे गोळे तयार करून ठेवावे. त्यानंतर कव्हरसाठीच्या पिठातून पोळीसाठी गोळे तयार करून प्रत्येक गोळ्याची पारी करून त्यात सारणाचा गोळा भरून बंद करून हलक्या हाताने पोळी लाटावी. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे-थोडे तूप सोडून भाजून घ्यावी.

कडाकणी

साहित्य :

१) १ वाटी मैदा
२) १ वाटी बारिक रवा
३) पाव वाटी साखर
४) १/२ वाटी दूध
५) मीठ चवीनुसार
६) तेल तळण्यासाठी

कृती :

सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये रवा, मैदा आणि मीठ एकत्र करून घ्या. त्यात गरम तेलाचे मोहन घालून घ्या. त्यानंतर दूध आणि साखर आधीच एकत्र करून ते वरील मिश्रणावर घालून घट्ट पीठ मळून घेऊन २-३ तास बाजूला करून ठेवा. त्यानंतर ते पीठ कुटुन घ्या आणि कुठलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्या. त्यानंतर सुरीने मधोमध टोचे मारून तेल गरम करून छान खरपुस तळुन घ्या आणि सर्विंग प्लेट मध्ये गरमा गरम सर्व्ह करा.

कुरमुऱ्याचे लाडू

साहित्य :

२ वाटी कुरमुरे
१ वाटी गुळ
३/ ४ चमचे तूप

कृती :

सर्वप्रथम कुरमुरे थोडेसे भाजून घ्या. थोडेसे कुरमुरे भाजून झाले का ते बाजूला काढून घ्या. त्यानंतर त्याच भांड्यात थोडेसे तूप टाकून गुळाचा खड्डा घाला. गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत ढवळत रहा. गुळ वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले कुरमुरे घाला आणि हे मिश्रण एकजीव करुन घ्या. गुळ आणि कुरमुरे एकजीव झाले का गॅस बंद करुन घ्या. त्यानंतर हाताला थोडेसे तूप लावून लाडू वळून घ्या. अशाप्रकारे तयार झाले झटपट कुरमुऱ्याचे लाडू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -