घरलाईफस्टाईलकापराने तुमचे घर करा रसायनमुक्त!

कापराने तुमचे घर करा रसायनमुक्त!

Subscribe

किडे घालविण्यासाठी, हवा ताजी व स्वच्छ ठेवण्यासाठी शुद्ध कापूर हा उपाय आहे. घरात वापरण्यासाठी अनेक प्रकारची मॉस्किटो रिपेलिंट (डासांना घालवणारी) उपकरणे उपलब्ध आहेत. कापूर हा या सगळ्या उपकरणांसाठी एक उत्तम पर्याय आहे. किंबहुना निलगिरी, सायट्रेनेला आणि तत्सम वनस्पतींप्रमाणे कापूर हा सुद्धा ‘अ’ वर्गातील मॉस्किटो रिपेलंट आहे. त्याच्या वासाने डास येत नाहीत.

बंद खोलीत कापूर जाळला तर त्याचा तीव्र धूर निर्माण होतो. तो डासांना त्या खोलीत येण्यापासून परावृत्त करतो. तुम्ही खोलीच्या कोपर्‍यात कापूर ठेवलात तरी हाच परिणाम होतो. तिथे कापूर ठेवलात तर दिवसभरात त्याचे बाष्पीभवन होते आणि तेथील हवा स्वच्छ व डासमुक्त होते. कापराचा अधिक व्यावहारिक उपयोग करायचा असेल तर रुंद बाऊल किंवा बशी घ्यावी. ती वायुविजन म्हणजेच हवा खेळती नसलेल्या कोपर्‍यांमध्ये ठेवावी. त्यात पाणी भरून घ्यावे आणि हलका चुरा केलेला कापूर त्यात घालावा. तो कापूर काही दिवसांनी वितळतो, त्यामुळे तुम्हाला त्यात पुन्हा कापूर घालावा लागेल.

- Advertisement -

शिल्लक राहिलेले पाणी फेकून देऊ नका. ते पाणी फरशी पुसण्यासाठी वापरावे. व्यावसायिक पातळीवर उपलब्ध असलेल्या मॉस्किटो कॉइल्स आणि प्लग इन उपकरणे विषारी असण्याची शक्यता असू शकते आणि त्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकतात. कापराची गोळी असेल तर मॅट वापरण्यात येणार्‍या कोणत्याही प्लग-इन रिपेलंट उपकरणात वापरता येऊ शकते
डासांप्रमाणेच ढेकूण आणि मुंग्यांवरसुद्धा कापराचा उपयोग करून नियंत्रण मिळविता येऊ शकते.

गादीच्या चार कोपर्‍यांखाली कापराच्या गोळ्या ठेवाव्यात. कापराच्या वासाने ढेकूण मरतात. कापराची पावडर शिंतडली किंवा कापराचा बेस असलेल्या क्लिनर्सनी जमीन स्वच्छ केली तर मुंग्या आणि इतर किडे येत नाहीत. कापराचा वापर केलेले रूम फ्रेशनर्स किंवा कापूर जाळल्याने हवा स्वच्छ आणि शुद्ध होते. कापूर घरातील नकारात्मक ऊर्जा घालवतो असेही मानले जाते आणि त्यांच्या रासायनिक पर्यायांमध्ये थॅलेट असते. ते महिला आणि लहान बाळांसाठी अपायकारक समजले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -