घरलाईफस्टाईलघरच्या घरीच बीट बनवा लिपस्टिक

घरच्या घरीच बीट बनवा लिपस्टिक

Subscribe

आरोग्य आणि सौंदर्यासाठी बीट खाणे फायदेशीर ठरते. दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केल्याने शरिरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी मदत मिळते. त्याचप्रणाणे चेहर्‍यावरील स्किनच्या समस्या दुर करण्यासाठी बीट देखील उपयुक्त ठरते. तसेच बीट हे ओठांचे आरोग्य राखण्यासाठी विशेष मदत करते.चेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भुमिका असते. महिलांच्या मेक-अप किटमध्ये सर्वात महत्वाची आणि आवडती कॉस्मेटिक म्हणजे लिपस्टिक.

बाजारात मिळणार्‍या लिपस्टिकमध्ये अनेक प्रकारचे केमीकल्स असतात हे केमीकल्स ओठांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. ओठांचा रंग काळपट होणे,स्किन खराब होणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजारातील लिपस्टिक ऐवजी तुम्ही घरच्या घरी लिपस्टिक तयार करु शकता.त्यासाठी बीटचा वापर फायदेशीर ठरतो. बीटमधील पोषकतत्व त्वचेचा काळपटपणा दूर करुन मूळ रंग वर आणण्यास मदत करतो. तर मग जाणून घेऊयात घरच्याघरी लिपस्टिक तयार करण्याबाबत.

- Advertisement -
साहित्य-

एक बी़ट,खोबर्‍याचे तेल, मिक्सर, गाळणी, छोटी वाटी,

कृती –

*सर्वात आधी बीट धुवून त्याचे साल काढून घ्या.
*त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
* तयार झालेल्या पेस्टमध्ये पाणी टाकू नका.
* तयार पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्या.(शक्यतोवर कुढल्याही धातूची वाटी न वापरता काचेची वाटी वापरा)
* पेस्ट पूर्ण बारीक झाली आहे याची खात्री करुन घ्या.
* वाटीमध्ये काढलेल्या पेस्टमध्ये एक चमचा खोबर्‍याचे (नारळाचे) तेल मिसळा.
* तेल फार कमी टाकले तर लिपस्टिक ड्राय होईल त्यामुळे त्यात एक चमचा किंवा थोडे जास्त तेल मिक्स करु शकता.
* पेस्टमध्ये नारळाचे तेल मिक्स करण्यासाठी चमचा किंवा टुथपिकचा वापर करा.
* मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर फ्रिझमध्ये ठेवा.
* फ्रिझमध्ये ठेवल्यानंतर ही पेस्ट घट्टसर होईल.
*पेस्ट थोडी घट्टसर झाल्यानंतर तुमच्याजवळील एखाद्या रिकाम्या लिपबामच्या कंटेनरमध्ये भरुन पुन्हा फ्रिझमध्ये ठेवा.त्यानंतर साधारण २ ते ३ तासाणी तुम्ही ही लिपस्टिक वापरु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -