प्लस साईज असेल तरीही बिनधास्त करा फॅशन!

तुम्ही प्लस साईज आहात आणि तुम्ही तुमच्या साईजवरुन न्यूनगंड बाळगत असाल आणि त्यावरुन तुम्हाला वाटत असेल की प्लस साईजमुळे तुम्ही फॅशन करु शकत नाही तर हे चुकीचे आहे.

Mumbai
Fatty Look

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही खास टिप्स ज्या तुम्हाला पोशाखाद्वारे स्लीमर लूक देतील.तुम्ही जर टिव्हीवरील सीरियलमधील महिला किंवा एखाद्या अवॉर्ड फंक्शनमधील महिला कलाकारांना बघता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, बर्‍याचश्या महिला या प्लस साईज असून सुद्धा त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये आकर्षक दिसतात. तुम्ही जर त्यांच्या ड्रेसस्टाईलकडे लक्ष दिले तर तुम्ही सुद्धा तुमची स्वत:ची एक स्टाईल मेंटेन करु शकता.

जर तुम्हाला फक्त इंडियन ड्रेस घालणेच आवडत असेल आणि तुम्ही ढिले दिसणारे सलवार सूट घालणे पसंत करत असाल तर प्रथम तुमच्या वॉर्डरोबमधून या ढिल्या कपड्यांना काढून टाका. कारण ढिले कपडे तुमच्या फिगरच्या आकाराला आणखीनच मोठे दाखवतात. त्या ऐवजी फिटिंगला बसणारे चुडीदार ट्राय करा. अनारकली सूट किंवा जास्त फ्लेअर्सचा पोशाख सुद्धा अव्हॉईड करा. ते सुद्धा तुमच्या लठ्ठपणाला आणखी ठळक दाखवतात.

*जर तुमचे वजन जास्त असेल तर जॉर्जेट, शिफॉन किंवा सिंथेटिक फॅब्रीकची साडी नेसा.
*एखाद्या फंक्शनला हेवी साडी नेसायची असेल तर हेवी म्हैसूर सिल्कची साडी घ्या.
*ही साडी तुम्हाला नक्कीच स्लिमर लूक देईल.

प्लस साईजच्या महिलांनी लांब सरळ रेषांचे, लहान प्रिंटचे कपडे घालायला हवे. अरगंडी किंवा सुती साड्या घालता कामा नये. कारण अशा साड्या घातल्यास त्या आणखीनच वजनदार, फॅटी लूक देतात.

म्हणून त्यांनी जॉर्जेट किंवा शिफॉन फॅब्रिकपासून तयार केलेला ड्रेस अथवा साडी घालायला हवी. मात्र एक गोष्ट लक्षात असू द्यावी की कुठलाही पोशाख हा कमरेजवळ खूप ढिला अजिबात नसावा.

तुम्ही असा विचार करु नका की, ढिले कपडे घातल्याने तुमचा लठ्ठपणा कमी दिसून येईल. उलट ढिल्या कपड्यांनी तुमचा लठ्ठपणा जास्त दिसून येईल. तसेच खूप टाईट कपडे पण घालू नका. कारण अतिशय टाईट कपड्यांनी सुद्धा तुमचा लठ्ठपणा आणखीनच जास्त दिसून येईल. त्यामुळे पोशाख हा नेहमी आपल्याला योग्य फिटींगला बसेल असाच परिधान करावा. जेणेकरुन तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.

वेस्टर्न वेअर करताना 

तुम्ही वेस्टर्न स्टाईलचे कपडे घालू इच्छिता, मात्र तुमच्या प्लस साईजमुळे तुम्ही ते घालायचे टाळताय. तर आता असे होणार नाही. कारण काही गोष्टी योग्य पद्धतीने वापरल्या तर वेस्टर्न स्टाईलच्या कपड्यांमध्ये सुद्धा तुम्ही सडपातळ दिसू शकता.
हलक्या सिंथेटिक कपड्यांनी तयार केलेल्या लेअरिंग पॅटर्नच्या ड्रेसनी तुम्हाला सडपातळ लूक मिळेल. तसेच अ‍ॅपल शेप फिगरमध्ये असलेल्या लेअरिंगमुळे तुमची बॉडी काही प्रमाणात शेपमध्ये दिसून येईल. कॅज्युअल वेअरिंगमध्ये सुद्धा तुम्ही दोन फॅब्रिक्स एकत्र करुन लेअरिंग करु शकता. याव्यतिरिक्त स्लिक स्टाईल डार्क कलरच्या जीन्स-स्कर्ट घालून सुद्धा तुम्ही थोड्या सडपातळ दिसून याल.

या चुका टाळा-
* कपड्यांमध्ये विविध रंग घालू नका. वरपासून खालपर्यंत एकच रंग घालाल तर सडपातळ दिसाल.
* पोलो नेकवाले ड्रेस तुम्हाला जडपणा देतील.
* फ्रिल्सवाल्या आणि शोल्डर पॅडवाल्या पोशाखांची निवड करु नका.
* खूप शाईनिंगवाल्या कपड्यांना घालणे टाळा.
* गळ्यात कमीत-कमी ज्वेलरी घाला. खूप भरगच्च ज्वेलरी घालणे टाळा.
वास्तविक पाहता फॅशनेबल दिसण्यासाठी वजन कमी होणे गरजेचे नाही. फक्त गरज आहे ती फक्त स्वत:मधील आत्मविश्वास वाढवण्याची आणि योग्य कपड्यांची स्टाईल करण्याची.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here