थंडीत ताजेतवाने दिसण्यासाठी करा हे उपाय

Mumbai
Skin Protection

थंडीचा सिझन हा फक्त चेहर्‍याचीच त्वचा नाही तर, हात, कोपर, पाठ आणि पायांचीही कोमलता हिरावतो. आपण थंडी तर रोखू शकत नाही, त्यामुळे आपल्यालाच आपल्या त्वचेच्या रक्षणासाठी उपाय करणे गरजेचे आहे.

चमकदार केसांसाठी
हिवाळ्यातील थंडीमुळे केसांना निर्जीव बनतात. यासाठी केसांना नियमित डीप कंडिशनिंग मास्क लावून मगच केस विंचरा. अन्यथा ते विंचरताना तुटतील.बाजारात अनेक कडिंशनिंग मास्क मिळतात. तुम्ही ते घरी सुद्धा बनवू शकता.यासाठी १ टेबलस्पून ग्लिसरीनमध्ये १ चमचा जैतुन तेल, व्हिनेगर, कॅस्टर ऑईल व्यवस्थित मिसळून घ्या. केस धुण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे केसांना लावा नंतर केस स्वच्छ शाम्पूने धुवा.

चेहर्‍यासाठी
हिवाळ्यात हवा थंड आणि कोरडी असते. त्याचा परिणाम चेहर्‍यावर लगेच दिसून येतो.चेहर्‍याची त्वचा खूप ड्राय होते. अशावेळी चेहर्‍याच्या त्वचेला जास्त पोषण हवे असते. अशावेळी चेहर्‍याच्या त्वचेसाठी डायड्रेटेट क्रिम वापरावे ज्यात एसपीएफ म्हणजेच सुर्यकिरणांपासून वाचवणारा घटक १५ टक्के असावा. याने चेहर्‍याच्या त्वचेचे रक्षण होईल. जर चेहरा जास्तच कोरडा झाला असेल तर दिवसातून कमीत-कमी २-३ वेळा मॉईश्चरायझर लावा.

कोपर व गुडघ्यांसाठी
कोपर व गुडघ्यांवर काळी पडणारी त्वचा खराब दिसते. हिवाळ्यात यावर फाटलेली त्वचा गोळा होऊन, पापुद्रा तयार होतो. यापासून सुटका करण्यासाठी, त्यावर नियमित स्क्रब जेलचा वापर केल्यास ही समस्या मिटवता येईल. यात असलेले स्क्रबमधील कण त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. तसेच कोपर जास्तच फुटलेले असतील तर एक्स्ट्रा रिच मॉईश्चरायझर क्रिमचा वापर करावा.

पाठीसाठी
पाठ नेहमीच उपेक्षित राहत असते. हल्लीच्या ब२कलेस फॅशनमध्ये आपली पाठ खरखरीत, फुटलेली दिसणे बरे दिसेल का? यासाठी आपण घेऊ शकता अ‍ॅरोमा मॅजिक ब्यूटी ग्रेस. हे आपण ब्राँझींग पावडरमध्ये बेबी ऑईल मिसळून पाठीवर लावू शकता.

टाचांसाठी 
थंडीच्या दिवसात टाचा खूप वाईट प्रकारे फुटतात. तेव्हा पॅडिक्यूअरसाठीचा फॉर्म्युलाही जरा हटकेच असायला हवा.
*नेलपॉलिश हटवून नखे कापून घ्या.
*कोमट पाण्यात १० मिनिटे पाय बुडवा आणि हलकासा मसाज करा.
*आता फ्रुट स्क्रबरने गुडघ्यापासून ते पायाच्या पंजांपर्यंत हलकेच घासून स्क्रब करून घ्या.
*नंतर एका उत्तम दर्जाच्या फ्रुट क्रिमने पायांना मसाज करा. मसाज करताना पायांच्या टाचेकडे विशेष लक्ष द्या. क्रिमने मसाज केल्यानंतर पायात मोजे घाला. म्हणजे पाय आणखीनच सुरक्षित राहतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here