‘या’ पाच गोष्टी करा, उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवा !

उन्हाळ्यात घ्या सुट्टीचा मजा

नवी दिल्ली – उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचे हा प्रश्न सगळ्याच पालकांना पडतो. धावपळीच्या युगात आता पूर्वीसारखे “मामाच्या गावाला जाऊया…”, असं म्हणत १-१ महिना गावी जाऊन राहणं, सर्वांनाच जमतं असं नाही. मुलांची हक्काची सुट्टी, पूर्ण एक महिन्याचा वेळ आणि करायला काहीच नाही. यामुळे मुलं चिडचिड करतात. मुलांना आनंदी ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

सुट्ट्यांमध्ये मुलांना घरी ठेवल्यास ते उच्छाद घालतात. या भीतीने पालक एक – दोन आठवड्यासाठी किंवा विकेंड भटकंतीचा प्लॅन बनवतात. कोणत्यातरी हिल स्टेशनवर, थंड हवेच्या ठिकाणी जाणं पसंत करतात. यातून पालकांना आणि मुलांना तात्पुरता विरंगुळा मिळतो. त्यांचा बौद्धिक विकास होत नाही. मुलांना मनोरंजनासह चांगले संस्कार देण्यासाठी काही हटके गोष्टी दिनक्रमात आणणे गरजेचे आहे.

मुलांचा ‘समर ब्रेक ‘मजेशीर बनवण्यासाठी या पाच गोष्टी करून बघा

हसा आणि खेळा

१ भरपूर वाचा, बोला
आमच्या काळी असं नव्हतं, हे वाक्य प्रत्येक आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीला ऐकायला मिळतं. जेव्हा सुट्ट्यांमध्ये आधुनिक पध्दतीचे मोबाइल्स, हातात सतत इडियट बॉक्सचा रिमोट, इलेक्ट्रॉनिक्स गेम्सचा पर्याय नव्हता. तेव्हा मुलं भरपूर पुस्तकं वाचायची, मैदानी खेळ खेळायची, परगावी राहणाऱ्या प्रिय व्यक्तींना स्वतःच्या हाताने पत्र लिहायची. याच गोष्टी सध्या मुलांनी दैनंदिन जीवनात आणणे गरजेचे आहे.

मैदानी खेळ खेळवेत

२ मैदानी खेळ जोपासा
अत्याधुनिक सोयीसुविधांच्या काळात मुलं २४ तास घरामध्ये बसून असतात. त्यांना मैदानी खेळांची फारशी आवड नसते आणि असली तरी पालक त्यांना जास्त वेळ घराबाहेर राहू देत नाहीत. यामुळे त्यांच्यात मैदानी खेळांचा अभाव दिसतो. मात्र शारिरीक आणि बौध्दिक वाढीसाठी मैदानी खेळ खेळणे अतिशय महत्त्वाचे आहे. खेळभावना निर्माण होणे, इतर मुलांमध्ये मिळूनमिसळून खेळणे, संघाचे नेतृत्व करणे असे अनेक फायदे मैदानी खेळामुळे होतात

निसर्गाशी मैत्री करा

३ निसर्गाशी मैत्री करा
टोलेजंग इमारतींच्या जगात राहणाऱ्या मुलांचा निसर्गाशी संपर्क तुटत चालला आहे. मात्र मुलांमध्ये निसर्गाच्याप्रती प्रेम निर्माण करण्याची हिच खरी योग्य वेळ आहे. लहान वयातच त्यांना निसर्गाचे महत्त्व पटवून देता येणे सोपे आहे. तांत्रिक उपकरणांशी काही काळासाठी ब्रेक घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची सवय मुलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल

पुस्तक वाचनाचा छंद

४ पुस्तकांशी मैत्री करा
या जगात पुस्तकापेक्षा जास्त प्रामाणिक मित्र दुसरा नाही, हा सुविचार तंतोतंत खरा वाटू लागतो जेव्हा आपण पुस्तकांना जवळ करतो. मात्र आजच्या काळातील मुलांना याचा प्रत्यय येत नाही. ही मुलं लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या जगात रमलेली आहेत. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांच्या भावनिक, सामाजिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी वाचन अत्यंत गरजेचे आहे

व्ह्युजवल्सचे माध्यम अधिक सोयीस्कर

५ बघा आणि शिका
मुलांना नवनवीन गोष्टींची ओळख करून देण्यासाठी चित्रांचा वापर हा नेहमीच प्रभावी ठरतो. खासकरून पाच वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांना माहिती देण्यासाठी व्ह्युजवल्सचे माध्यम अधिक सोयीस्कर असते. त्यामुळे मुलांना हसत खेळत शिकवताना प्रात्यक्षिकांचा वापर करा आणि परिणाम बघा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here