घरलाईफस्टाईलसमर कूल 'ग्लॅडिएटर्स'! आता उन्हाळ्यातही राहा कूल कूल!

समर कूल ‘ग्लॅडिएटर्स’! आता उन्हाळ्यातही राहा कूल कूल!

Subscribe

उन्हाळा म्हणजे घाम, खूप घाम आणि फक्त घाम… फॅशनला नो चान्स .. बट गाईज यू आर राँग..कारण उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या फुटवेअरमध्ये व्हरायटी आणू शकता. उन्हाळा तुम्हाला घामाने भिजवणारा असला तरी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला चपलांच्या वेगवेगळ्या व्हरायटी ट्राय करता येतात…

ग्लॅडिएटर्स शूज हा काही फॅशनचा नवी प्रकार नाही. कारण अशा प्रकारचे शूज प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांनी घातलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. पण सध्याच्या सीझनमधला स्टाईल स्टेटस पाहता ग्लॅडिएटर्स हा सूपर कूल पर्याय आहे. ‘अँकल टू नी’ अशा टाईपमध्ये मिळणारे हे शूज वेस्टर्न आऊटफिटवर हटके दिसतात पण थोडसं डोक लावलं तर तुम्हाला तुमच्या फॉर्मल वेअरला सुद्धा हे शूज वेगळा लूक देतात.

- Advertisement -

या सीझनमध्ये आपसुकच सगळ्यांना मोकळे कपडे घालायला आवडतात. मग काय डेनिम, कॉटन वनपीस, पलाझो पँन्टस, कोल्ड शोल्डर सारख्या ट्रेंडी टॉप्सकडे सगळ्यांच्याच नजरा खिळतात. जर तुम्ही हा बदल तुमच्या वॉर्डरोबमध्ये केला असेल तर शूज सुद्धा बदला. शॉर्ट डेनिम, कॉटन वन पीस, हॉट शॉर्ट, टि शर्ट वनपीस, फ्लेअर, एलाईन स्कर्टस यावर अँकल लेन्थचे ग्लॅडिएटर्स शोभून दिसतात. शिवाय त्यातही व्हरायटी आहेच. हिल्स आणि फ्लॅट शू सोबतच लेस टायिंग आणि फूल झीपचा ऑप्शन आहे. जर तुम्ही नी लेंथ पलाझो घालणार असाल तर त्यावरही ग्लॅडिएटर्स जाऊ शकतात. पण, तुमच्या लूक नुसार तुम्ही शूज निवडणं गरजेचं आहे.

समरकूल ग्लॅडिएटर्स
अॅंकल लेंथ पार्टीवेअर

सध्या अँकल लेन्थ जीन्स, श्रेडेड किंवा रिप्ड जीन्स, कॅपरी पँटस ही फॅशन इन आहे. जर तुम्ही तशा प्रकारची जीन्स वेअर केली असेल.. तर तुम्ही त्यावर अँकल लेंथ ग्लॅडिएटर्स घालता येतील.पण या जीन्स स्कीन टाईट असतील तरच ते ग्लॅडिएटरला न्याय देऊ शकतात. बॉय फ्रेंड जीन्स आणि मीड फिट फूल लेंथ जीन्सवर त्या तितक्या शोभून दिसत नाही. यावर तुम्ही झीप इनचा ऑप्शन निवडणंच योग्य आहे.

- Advertisement -

पार्टीवेअरचा विचार केला तर ग्लॅडिएटर या शब्दातच ग्लॅमर आहे. त्यामुळे शॉर्ट वनपीस पासून ते लाँग फ्रंट कट गाऊनपर्यंत, सगळ्या रंगावर आणि ड्रेस टाईपवर ग्लॅडिएटर ग्लॅमरस लूक देतात. शिवाय शूज पाय कव्हर करत असल्यामुळे तुम्हाला जास्त अॅक्सेसरीज घालायचीही गरज नाही.

समरकूल ग्लॅडिएटर्स
फॉर्मल ग्लॅडिएटर

जरी तुम्ही ऑफिस गोईंग असाल तरीसुद्धा तुम्हाला ही फॅशन कॅरी करता येईल. फॉर्मल स्कर्ट्स, पॅन्ट्स जर तुम्ही घातले असतील तर यातील फॉर्मल शूजचा ऑप्शन निवडा.

हिल्सचे प्रकार कोणते?
ग्लॅडिएटरमध्ये हिल्सचा विचार करता स्टिलेटोझ, ब्लॉक हिल्स, वेज हिल्सचा पर्याय आहे.

मटेरिअल कोणते?
ग्लॅ़डिएटरच्या मटेरिअलचा विचार केला तर ग्लॉसी लेदर, प्लेन लेदर, वेलवेट मटेरिअलमध्ये हे बघायला मिळतात. यातही शूजवर स्टोन वर्क, लेस वर्क, थ्रेड वर्क, ग्लिटर वर्क असे प्रकार आहेत.

कितीला?
३०० ते ५०० रुपयांपर्यंत या शूजच्या किंमती आहेत. जर तुम्ही बारगेन करण्यात एक्सपर्ट असाल तर तुम्ही स्वस्तात मस्त हे शूज घेऊ शकता.

कुठे शोधाल?

फॅशन स्ट्रीट, कुलाबा कॉजवे, दादर, घाटकोपर, पवई या भागात साध्या शूजच्या दुकानातही सध्या हे शूज बघायला मिळत आहेत

टीप
जर तुमची उंची कमी असेल आणि बांधा मघ्यम असेल तर नी लेंथ शूज टाळा. तुम्ही अॅंकलपेक्षा कमी उंचीचे शूज ट्राय करा आणि जर ते तुमचा लूक अधिक चांगला करत असतील तरच ते शूज निवडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -