घरलाईफस्टाईलवर्क आऊटसाठी करा झुंबा

वर्क आऊटसाठी करा झुंबा

Subscribe

रोजच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून व्यायामासाठी सहसा वेळ द्यायला कोण तयार होत नाही. तरी देखील आरोग्य, फिटनेस तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वास महत्त्व देणार्‍यांची संख्या वाढताना दिसते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने व्यायाम करणारी पावलं आता पॉवर योगा आणि झुंबा या व्यायाम प्रकाराकडे वळले.

अनेक स्त्रिया आपलं घर, नोकरी सांभाळत स्वतःच्या हेल्थ फिटनेसकडे प्राधान्याने लक्ष देऊ लागल्या आहेत. फिटनेस फंडे आजमावणे, सुट्टीच्या दिवशी जरा अर्धा तास चालणं, घरच्याघरीच सूर्यनमस्कार करणे किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाईज करण्यावर तिचा भर असतो.

- Advertisement -

मात्र नृत्याची इच्छा, आवड असलेले अनेकजण झुंबाचा पर्याय निवडतात. या निमित्ताने कलेची आवड जोपासली जाऊन नव्या-जुन्या गाण्यांवर व्यायाम केला जातो. झुंबा हा प्रकार पाश्चात्य जरी असला तरी सर्व वयोगटातून त्यास पसंती दिली जाते. झुंबा या व्यायाम प्रकारात संगीताच्या ठेक्यावर ताल धरून स्टेप्स करायच्या असतात. या स्टेप्स कोणालाही सहज शक्य असतात. अ‍ॅरोबिक्स व्यायाम प्रकारात मोडणारा झुंबा करण्यावर वयाचे कुठलेही बंधन नसते. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत वयोगटानुरुप झुंबाचे प्रशिक्षण दिले जाते.

झुंबाचे काही प्रकारही आहेत, ज्याप्रमाणे

- Advertisement -

टोनिंग झुंबा – टोनिंग स्टिक्सचा वापर करून झुंबाच्या स्टेप्स केल्या जातात.

अ‍ॅक्वा झुंबा – स्विमिंग पूलमध्ये झुंबाच्या स्टेप्स करण्याच्या प्रकारास अ‍ॅक्वा झुंबा असे म्हणतात.

गोल्ड झुंबा – चाळीशीवरील व्यक्तींसाठी गोल्ड झुंबा हा प्रकार विकसित केला आहे.

झुंबाटोमिक- हा झुंबा प्रकार चार ते बारा वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी आहे.

हे झुंबाचे काही मुख्य प्रकार आहेत.

या झुंबा व्यायाम प्रकारामुळे वजन कमी होते, तसेच शरीर लवचिक होण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात, हृदयाचे आरोग्य सुधारुन शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. हात, पाय, पोट, कंबर शरीराच्या सर्व स्नायूंना एकत्रितरित्या व्यायाम देणार्‍या झुंबाला एक संपूर्ण व्यायाम प्रकार म्हणता येईल.मात्र, अती स्थूल व्यक्तींनी झुंबा करू नये. कारण, डान्स स्टेप्स करताना शरीराचा भार पायाच्या सांध्यांवर पडतो. ज्यामुळे, गुडघेदुखीचा त्रास उद्भवतो. म्हणून, इतर व्यायाम प्रकारांच्या मदतीने प्रथम थोडे वजन कमी करून मग झुंबा करणे उत्तम. कंबरदुखीचा त्रास असणार्‍यांनी देखील झुंबा करणे टाळावे. हे अपवाद सोडल्यास डान्स व व्यायाम असा दुहेरी आनंद देणारा झुंबा सध्या सर्व वयोगटाच्या पसंतीचा ठरतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -