आंबावडी रेसिपी

जाणून घ्या आंबावडीची रेसिपी

Mango Barfi
जाणून घ्या आंबावडीची रेसिपी

आंब्याचा सिझन असल्यामुळे घरात आंबे येत असतील. त्यामुळे सारखे आंबे खाऊन कंटाळा आला असेल तर आंबावडी नक्की करा. यामुळे आंब्याचा सिझन गेल्यानंतरही त्या आंब्याचा आस्वाद घेता येईल.

साहित्य

  • आंब्याचा रस
  • १ कप साखर
  • ३ चमचे पिठीसाखर
  • २ चमचे तूप
  • बदामाचे काप किंवा ड्रायफ्रुट्स

कृती

सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आंब्याचा रस आणि साखर एकत्र करुन घ्या. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे. नंतर गॅस बंद करुन मिश्रण थंड करुन घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर पिठीसाखर एकत्र करुन घ्यावी. त्यानंतर मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत आणि लाटता येईपर्यंत एकत्र करावे. मिश्रणाचा गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर लाटून घ्यावे. त्यानंतर वर ड्रायफ्रुट्स घालून त्याच्या वड्या पाडाव्यात.


हेही वाचा – खमंग कुरकुरीत कोबी पकोडा