घरलाईफस्टाईलदसरा स्पेशल : मँगो श्रीखंड

दसरा स्पेशल : मँगो श्रीखंड

Subscribe

घरच्या घरी तयार करा मँगो श्रीखंड

दसऱ्याच्या दिवशी घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. घरातील मंडळींना या दिवशी खास पदार्थांची मेजवानी खाण्यासाठी मिळते. तर दसऱ्याच्या दिवशी खास नैवेद्य ही बनवला जातो. या दिवशी घरात गोड पदार्थ म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंडाचा समावेश जेवणात केला जातो. त्यामुळे आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने मँगो श्रीखंड कसे बनवाचे ते पाहणार आहोत.

साहित्य –

दह्याच्या चक्का २५० ग्रॅम
पीठीसाखर २५० ग्रॅम
आंब्याचा रस
अर्धा चमचा वेलची पूड
३ – ४ चमचे दूध
चिमूटभर जायफळ

- Advertisement -

कृत्ती – 

एका बाऊलमध्ये सर्वप्रथम दह्याचा चक्का फेटून घ्या. म्हणजे त्यामधील काही गुठल्या असल्यास त्या निघून जातील. त्यानंतर त्यामध्ये पीठीसाखर टाका. तसेच तीन ते चार चमचे दूध घालून हे मिश्रण फेटून घ्या. त्यानंतर मिश्रण फेटून झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा रस सुद्धा त्यामध्ये मिक्स करा. पुन्हा एकदा हे मिश्रण फेटताना त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकून ५-१० मिनिटे फेटावे. तसेच आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुटचा वापर करुन गरमागरम पुरीसह सर्व्ह करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -