घरलाईफस्टाईलगूळ खाण्याचे अनेक फायदे

गूळ खाण्याचे अनेक फायदे

Subscribe

गूळ केवळ खाद्य पदार्थ नसून एक अँटी टॉक्सिन आहे. गूळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तातील हानीकारक टॉक्सिनला बाहेर काढून त्वचेची सफाई करण्यात मदत करतो. त्यामुळे गुळाचे नियमित सेवन केल्याने पिंपल्सची समस्याही दूर होते. आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुळाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो. त्वचेसोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

हे उपाय करून बघा
पिंपल्सची समस्या सामान्य आहे. खाण्यात जास्त तेल-मसाल्यांच्या उपयोगामुळे किंवा धुळीमुळे पिंपल्स येतात. जर रोज थोडा थोडा गूळ खाल्ला तर ही समस्या दूर होऊ शकते.

गुळामध्ये आयर्नचा समावेश असतो. त्यामुळे सकाळी-सकाळी पाण्यासोबत याचं सेवन केल्यास एनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो.

- Advertisement -

जर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल, तेव्हाही गूळ खाणे अधिक फायदेशीर असू शकतं. थकवा जाणवल्यास थोडा गूळ पाण्यासोबत घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.

गूळ गॅस आणि पचनाशी संबंधित समस्याही दूर करतो. जेवण केल्यानंतर थोडा गूळ खावा त्याने पचनही चांगलं होतं आणि गॅसची समस्याही दूर होते.

- Advertisement -

दम्याचा त्रास होत असला तरी गुळामुळे फायदा होतो. गुळामध्ये अँटी अ‍ॅलर्जिक तत्व असतात जे दम्याला आराम देतात. यामुळे शरीरातील तापमानही नियंत्रित राहतं.

श्वासासंबंधी काही त्रास असेल तर त्यावरही गूळ फायदेशीर होऊ शकतो. पाच ग्रॅम गूळ तितक्याच सरसो तेलात मिसळून खावे, त्याने श्वासाशी निगडीत समस्या दूर होईल.

घसा बसल्यावरही गुळाने आराम मिळतो. घसा बसल्यास शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे.

इतकेच काय तर कान दुखत असेल तर त्यावरही उपाय म्हणून गूळ वापरता येतो. गुळाला तुपासोबत मिसळून खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -