घरताज्या घडामोडीअचानक वजन वाढतयं ? ही आहेत त्यामागची कारणे

अचानक वजन वाढतयं ? ही आहेत त्यामागची कारणे

Subscribe

वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत.

तुम्ही आरोग्याविषय़ी जागरुक आहात. डाएट करत आहात. खाण्यापिण्यावर तुमचं निय़ंत्रण आहे. जिमही करत आहात. पण तरीही अचानक तुमच वजन वाढतयं. काय असेल यामागची कारणं हे जाणून घ्यायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

साधारणत: योग्य प्रमाणात आहार आणि नियमित व्यायाम ही वजन कमी करण्याचे दोन प्रमुख सूत्र आहेत. जर तुमच खाणंपिणं मोजून मापून असेल तुम्ही नियमित व्यायाम, जिम करत असाल तर तुमच वजन वाढता कामा नये. पण बऱ्याचवेळा एवढा सगळा खटाटोप करूनही काही जणांच वजन वाढत असतं. यामागे अनेक छुपी कारणं आहेत.

- Advertisement -

मानसिक ताण तणाव…

मानसिक ताण ही आता सर्वच वयोगटातील समस्या आहे. कधी कामाचा ताण तर कधी अभ्यासाचा ताण तर कधी नको ते विचार करुन आपण उगाचाच ताण ओढवून घेतो. याचा थेट परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो. त्यामुळे आपण गरज नसतानाही खातो. ताण दूर करण्यासाठी मग काहीजण वाटेल तेवढे खातात. ज्यामुळे कॅलरीज वाढते. कॅलरीज वाढल्या की वजन वाढतं.

- Advertisement -

खाण्याचे प्रमाण
आपण किती खातो यावरही आपल वजन अवलंबून असतं. काहीजणांचे जिम, डाएट करुनही वजन आहे तेवढेच राहते. ते कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही रोज जेवढे अन्न खाता त्या तुलनेत कमी व्यायाम करता. परिणामी शरीरात जमा होणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज आहे तशाच राहतात. त्यामुळे वजन कमी न होता वाढत राहते.

अपुरी झोप
अपूर्ण झोप हे देखील वजन वाढण्यामागचे मुख्य कारण आहे. खूप झोपल्यामुळे किंवा कमी झोप मिळाल्यामुळेही वजन वाढते. खूप झोपल्यामुळे किंवा कमी झोपल्यामुळे गरजेपेक्षा जास्त कॅलरीज शरीरात जमा होतात.

जेवणाचा कंटाळा करणे

काहीजणांना ठारविक पदार्थच खाण्यास आवडतात. त्यामुळे तो पदार्थ खाणे टाळण्यासाठी ते इतर पदार्थ रेटून खातात. यामुळे साहजिकच वजन वाढते.

औषधांमुळे वजन वाढते

अनेक औषधांच्या दुष्परिणामामुळेही वजन वाढते. त्यात प्रामुख्याने डीप्रेशन, किडनीचे विकार, आणि कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांमुळे वजन वाढते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नयेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -