घरलाईफस्टाईलस्वादिष्ट 'मावा मोदक'

स्वादिष्ट ‘मावा मोदक’

Subscribe

स्वादिष्ट 'मावा मोदक' रेसिपी

बाप्पा यायला अवघे दोन दिवस बाकी राहिले आहे. सर्व तयारी झाली आहे. मात्र, बाप्पाला गोडाचा नैवद्य काय द्यावा, असा प्रश्न नेहमी पडतो. त्यात उकडीचे मोदक हे सर्रास बनवले जातात. म्हणून आपण त्यात वेगळेपण आणणार आहोत. त्यामुळे यंदा जर उकडीचे मोदक करत असाल तर त्यासोबत खव्याचे मोदक नक्की ट्राय करुन पहा.

साहित्य:

  • /२ कप खवा
  • १/२ कप साखर
  • २ ते ३ टेस्पून मिल्क पावडर
  • २ चिमटी वेलची पूड

कृती:

साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा. त्यानंतर खवा मायक्रोवेव्हसेफ भांड्यात ठेवून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून ४० ते ४५ सेकंद ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा. त्यानंतर भांडे बाहेर काढून ढवळा. खवा कोमटसर झाला कि पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून मिक्स करुन घ्या. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत. मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घालून मिश्रण हाताने मळून घ्यावे.

- Advertisement -

[खूप जास्त मळू नये, फक्त नीट मिक्स होईस्तोवर मळावे. नाहीतर गोळा तुपकट आणि चिकट होईल].

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -