मनाच्या स्वास्थ्यासाठी करा मेडिटेशन

Mumbai
Medittion

आपल्या मनाचे स्वास्थ्य आणि मनाची असणारी स्थिती अनेक आजारांना आमंत्रण देते. या मानसिक आजारांमुळे मानसिक ताण-तणावात भर पडते. त्यामुळे येणारे मानसिक नैराश्य मनास कमजोर बनवते. त्यामुळे सातत्याने मेडिटेशन म्हणजेच ध्यान करणे आरोग्यास लाभदायक ठरते.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे डोक्यात अनेक विचारांचे वादळ सुरू असते. यावेळीच उद्याच्या दिवसाचे नियोजनही डोक्यात सुरू असते. एका जागी शांत, स्थिर बसून मन एकाग्र करणे हे सर्वांना जमतेच असे नाही. पूर्ण दिवस ऑफिसचे काम, नोकरीचा ताण, कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक गणितं या सगळ्या विचाराने मनास आणि मेंदूस विश्रांती मिळावी यासाठी प्रत्येक दिवशी मेडिटेशन करणे गरजेचे आहे. उद्याच्या येणार्‍या दिवसाचे स्वागत करताना ते तणावमुक्त जरूर व्हावे यासाठी ध्यान म्हणजे मेडिटेशन आठवड्यातून २ ते ३ वेळा करायलाच हवे.

असे करा मेडिटेशन                                                                                                        मेडिटेशन करण्यासाठी घरात वेगळी खोली असलीच पाहिजे असे नाही. घरात असणारी कोणतीही शांत जागा तुम्ही ध्यान करण्यास निवडू शकतात. हे ध्यान करताना मोबाईल फोन, लॅपटॉप या यंत्रांसोबत डोक्यात चालणारे अनेक विचार स्वतः पासून दूर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेऊन डोके शांत ठेवा. मनात कोणता विचार न आणता डोळे बंद ठेऊन मन एकाग्र करा. आपल्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. या मेडिटेशन करत असलेल्या जागी शांत संगीत आणि सौम्य सुगंध असलेले अत्तर मारून वातावरण निर्मिती करून मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन करण्यासाठी सकाळची वेळ शक्यतो निवडा. कामानिमित्त जमले नाही तर रात्री झोपण्यापूर्वीची वेळ निवडली तरी चालते. आपल्या सोयीनुसार पाच मिनिटे, दहा मिनिटे, पंधरा मिनिटे वेळेची मर्यादा निश्चित करा.

मेडिटेशनचे काही फायदे.                                                                                                   *नियमित मेडिटेशन केल्यास स्मरणशक्ती वाढीस लागते.
*मनावर नियंत्रण मिळवल्याने, आत्मविश्वास वाढीस लागून सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळते.
*मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी कमी होतात.
*रोगप्रतिकारशक्ती वाढून रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.
*निद्रानाशाच्या समस्येपासून सुटका मिळते.
*रागीट किंवा चिडचिडा स्वभाव नियंत्रणात आणता येतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here