डोक्यातच नाही तर पोटातही होतो ‘मायग्रेन’!

abdominal migraine
'अॅब्डॉमिनल मायग्रेन'

‘मायग्रेनचा त्रास होत आहे’ असे म्हटले जाते, त्यावेळी डोळ्यांसमोर येते ती डोकेदुखी. मात्र, मायग्रेनमुळे पोटात देखील वेदना होत असल्याचे समोर आले आहे. पोटात दुखणाऱ्या या मायग्रेनला ‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’ असे म्हटले जाते. हा एक मायग्रेनचा प्रकार असून यामुळे पोटात गंभीर दुखणे, थकवा येणे, मुरडा आणि उलट्या असे प्रकार होतात.

abdominal migrain
(फोटो प्रातिनीधिक आहे)

कोणाला होतो हा आजार?

‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’ ह्या आजारामध्ये प्रचंड प्रमाणात पोट दु:खी होते. हा आजार अनुवांशिक असून तो लहान मुलांना देखील होतो. ज्यांच्या पालकांना ‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’ असतो, त्यांच्या मुलांनाही या आजाराचा धोका अधिक प्रमाणात असतो. पालकांचा हा आजार पाल्यांमध्ये हमखास उतरतो. मुलांपेक्षाही मुलींमध्येही प्रामुख्याने याचे प्रमाण आढळून येते. ज्या लहान मुलांना ‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’चा त्रास होतो, त्यांना मोठेपणी डोकेदुखीचा मायग्रेन होतो.

noodles
(फोटो प्रातिनीधिक आहे)

‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’ ची कारणे

‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’ या आजाराचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे शरीरात दोन कंपाउंड असतात. एक म्हणजे हिस्टामाइन आणि दुसरे म्हणजे सेरोटोनिन. हे कंपाउंड या आजाराला जबाबदार ठरतात. मोनोसोडियम ग्लूटामेट किंवा एमएसजी, प्रोसेसेड मेट्स आणि चॉकलेट याचा अधिक वापर केल्यामुळे हे कंपाउंड शरीरात तयार होतात. तसेच चायनीज फूड्स आणि नूडल्स यामुळे देखील हा त्रास उद्भवतो.

‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’ ची लक्षणे

  • पोटदुखी समस्या
  • पोटाचा रंग पिवळसर दिसतो
  • दिवसभर थकवा आणि सुस्ती येणे
  • भूक कमी लागणे. खाण्या-पिण्याची इच्छा न राहणे
  • डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे
  • ‘अॅब्डॉमिनल मायग्रेन’चे दुखणे सामान्यपणे अर्ध्या ते एका तासात थांबते. तर काहीवेळा दोन – तीन दिवस देखील त्याचे दुखणे चालू राहते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here