घरलाईफस्टाईलकूल वातावरणात करा गरमा गरम 'तंदूरी आलू टिक्का' रेसिपी

कूल वातावरणात करा गरमा गरम ‘तंदूरी आलू टिक्का’ रेसिपी

Subscribe

बाहेरून काही ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या घरी ट्राय करा 'तंदूरी आलू टिक्का' रेसिपी.

कूल वातावरणात करा गरमा गरम ‘तंदूरी आलू टिक्का’ रेसिपी नुकताच पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. बाहेरील कूल वातवरणात थंडावा असल्याने गरमा गरम खाण्याची हमखास ईच्छा होत असते. अशा पावसामध्ये गरमागरम कांदा भजी, चहा किंवा बटाटे वडे यांसारख्या पदार्थांना घरच्यांकडून मागणी केली जाते. अशावेळी बाहेरून काही ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या घरी ट्राय करा ‘तंदूरी आलू टिक्का’ रेसिपी.

- Advertisement -

तंदूरी आलू टिक्का रेसिपी करण्यासाठी साहित्य :

  • लहान बटाटे
  • गरम मसाला पावडर
  • धने पावडर
  • अर्धा चमचा लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • पाणी काढलेलं दही
  • लाल मिरची पावडर
  • कसूरी मेथी
  • व्हेजिटेबल ऑइल

तंदूरी आलू टिक्का रेसिपी करण्यासाठी कृती :

  • गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करा आणि त्यामध्ये मीठ एकत्र करून बटाट उकडून घ्या.
  • बटाटे उकडल्यानंतर त्यांची साल काढून तुकडे करा. आता बटाट्याचे तुकडे एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये दही एकत्र करा.
  • आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि कसूरी मेथी एकत्र करा. काही वेळासाठी हे मिश्रण तसचं ठेवा.
  • आता एक नॉन स्टिक पॅन घ्या आणि त्यामध्ये थोडं तेल गरम करा. जेव्हा तेल गरम होइल तेव्हा त्यामध्ये बटाटे टाकून फ्राय करून घ्या.
  • फ्राय केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि वरून लिंबाचा रस टाकून व्यवस्थित एकत्र करा.
  • तुमच्या आवडीच्या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा ‘तंदूरी आलू टिक्का’.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -