वेटलॉस करण्यासाठी हे ‘नॅचरल स्वीटनर्स’ वापरा

Mumbai

साखरेमुळे कॅलरीज वाढणे आणि इतर आजारांना आमंत्रण दिले जाते. गोड पदार्थांना टाळून आपण डाएट प्लॅन करतो. हे आपल्या शरिराला घातक असते. हे डाएट सोडायची खूप इच्छा असते पण वजन कमी करण्यासाठी आपण हे कसंबसं फॉलो करतो. पण ‘नॅचरल स्वीटनर्स’मुळे आपलं वजन कमी होऊ शकते आणि फिटसुद्धा राहता येत. या तीन गोष्टी तुम्ही डाएट प्लॅनच्या दरम्यान नक्की ट्राय करून पाहा.

मध

घरगुती वापरात प्राकृतिक मध अनेक शतकांपासून प्रमुख घटक आहे. मधात व्हिटॅमीन आणि प्रोटीन मिनरलचे प्रमाण जास्त असते. मध पचनासाठी हा खूपच फायदेशीर असतो. तसेच मध शरीरातील आवश्यक अँटी ऑक्सीडंटचा स्तरही वाढवतं. एक चमचा मधात २० कॅलरीजचे प्रमाण असते.

कोकोनट शुगर

कोकोनट शुगरमध्ये भरपूर खनिजं म्हणजे आर्यन, झिंक, कॅल्शियम असते. तसेच पोटॅशिअमसोबतच काही फॅटी एसिड, पॉलीफिनॉल आणि अँटीऑक्सीडंटयुक्त असते. या शुगरमध्ये इन्यूलीन नावाचं फायबर असतं. जे रक्तामध्ये ग्लुकोज मिसळण्यास मदत करतं. खास करून डायबेटीसने पीडित लोकांसाठी हे खूपच लाभदायक आहे.

ऊसाचा रस

ऊसाचा रस हा एक नॅचरल स्वीटनर आहे. एनर्जी ड्रींक, बॉडी क्लिंजर तसंच अनेक औषधी आणि पोषक गुणांनी युक्त ऊसाचा रस आहे. ऊसाचा रस हा पौष्टीक असतो.