घरलाईफस्टाईलनवीन वर्षाचा संकल्प सत्यात उतरवा!

नवीन वर्षाचा संकल्प सत्यात उतरवा!

Subscribe

यंदाच्या नवीन वर्षात हे संक्लप तुम्ही करुन पहा.

दरवर्षी ३१ डिसेंबर आला की, बऱ्याच जणांमध्ये १ जानेवारी मध्ये दाखल झाल्यानंतर एक वेगळाच उत्साह संचारतो. त्या उत्साहात सगळेच जण आपल्या आयुष्यात मोठमोठे ‘पण’ करतात. मात्र, हे पण पूर्ण होतातच का? असे जर विचारले तर बऱ्याच व्यक्ती नाही, असे देखील बोलतात. याचाच अर्थ जानेवारीमध्ये सुरु केलेला संकल्प जानेवारीतच बंद होतो. अहो, पुढच्या जानेवारीत नाही तर त्याच वर्षाच्या जानेवारीत बंद होतो. तर मित्रांनो हे रेझोल्युशन म्हणजे निग्रह किंवा नवीन निश्चय म्हणा…पण हा एक अजब प्रकार आहे. त्यामुळे यंदाच्या नवीन वर्षात जर तुम्ही काही सकंल्प सत्यात उतरवत असाल काळजी देखील तितकीच घ्या.

जिमला जाऊन वजन कमी करणार

- Advertisement -

बऱ्याचदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक तरुणी फीट राहण्यसाठी जिम लावण्याचा पण करतात. मोठ्या उत्साहात त्या जिममध्ये प्रवेश घेतात आणि पैसे देखील भरतात. मात्र, त्या काही जिम सातत्याने सुरु ठेवत नाही, आणि त्यामुळे त्याचा शरिरावर उलटा परिणाम होतो. बऱ्याचदा जिम सुरु करुन मध्येच सोडली जाते. यामुळे वजन कमी नाही तर अधिक वाढते आणि याचा उलटा त्रास होतो. त्यामुळे जर तुम्ही सातत्याने जिम करणार असला तरच जिममध्ये प्रवेश घ्या. अन्यथा दररोज २० ते ३० मिनिटे सकाळी चालण्यास जा. यामुळे त्याचा चांगला फायदा होईल आणि तुमचे पैसे देखील वाचतील. त्याचबरोबर तुम्ही फीट देखील रहाल.

फास्ट फूड बंद करणे

- Advertisement -

वडापाव, भजी, पिझ्झा, बर्गर, समोसा, फ्रेंच फ्राईज, रोल्स, फ्रँकी आणि इतर चाट पदार्थ यांचा फास्ट फूडमध्ये समावेश असतो. मात्र, हे फास्ट फूड घातक असल्याचे माहिती असून देखील लोकांची त्याला पसंती असते. मात्र, बऱ्याच व्यक्ती नवीन वर्षात फास्ट फूड बंद करण्याचा पण करतात. मात्र, तो ‘पण’ काही पूर्ण होत नाही. यामुळे सातत्याने सतावणारा लठ्ठपणा बळावतो. त्याचबरोबर तारुण्यावस्थेत येताना होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे सतत नैराश्य येणे. थकवा येणे. हृदयरोगाचा धोका संभवणे. कोलेस्टॉल वाढणे अशा एक नाही तर अनेक समस्या वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे फास्ट फूड बंद करणे हा जर संकल्प तुम्ही करत असाल तर तो कायम ठेवा. यामुळे तुम्ही फीट देखील रहाल.

दारु, सिगरेट सोडणे

बऱ्याचदा नवीन वर्षात काय संकल्प करणार, असे विचारल्यास दारु, सिगरेट सोडणार हे सांगण्यात येते. मात्र, सिगरेट, दारु सुटता न सुटणारी असते. अनेकदा त्यावर औषध देखील दिली जातात. मात्र, त्या औषधांचा उलटा परिणाम शरिरावर होतो. त्यामुळे दारु, सिगरेट याचे गेल्यावर्षीपेक्षा यंदा प्रमाण तरी कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करता येईल.

वाहतूकीचे नियम पाळा

बऱ्याचदा वाहतूकीचे नियम पाळा, असे सांगितले जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेकदा अपघात देखील होतात. त्यामुळे स्वत:ची काळजी घेण्यासाठी वाहतुकीच्या नियमाचे पालन करा. सिग्नलवर बाकी कुणी थांबो न थांबो, आपल्यापासून सुरुवात करा आणि नियम पाळा. यामुळे दंड देखील कमी भरला जाईल आणि सुखरुप प्रवास होईल.

भांडण न करता प्रवास करा

मुंबईकर बऱ्याचदा रेल्वे, बस, रिक्षा आणि टॅक्सी यातून प्रवास करतात आणि या प्रवासादरम्यान अनेकदा भांडण देखील होतात. त्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना कमीतकमी भांडण आणि अधिकाधिक शांततेत प्रवास करा. तसेच धक्काबुक्कीतही थोडसे मौन पाळा. यामुळे तुमचाही आणि समोरच्या व्यक्तीचाही प्रवास सुखरुप होईल.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -