घरलाईफस्टाईलमटण कोफ्ते

मटण कोफ्ते

Subscribe

साहित्य-
खिमा- 500 ग्रॅम
खसखस- 2 मोठे चमचे
अंडी 1 किंवा 2 चमचे भाजलेले बेसन,
5-6 कांदे
10-12 लसणाच्या पाकळ्या,
आले-छोटा तुकडा
चवीनुसार मीठ,
हळद-1/2 चमचा
धन्याची पूड-4 चमचे
तिखट-2 चमचे
मसाला-1/2 वाटी
तेजपान- 5-6 पाने
गोड मसाला- 1/2 चमचा
तूप-तळण्यासाठी

कृती-
*कोफ्ते बनवण्याच्या अगोदर खसखस स्वच्छ करून धुऊन भिजत ठेवावे. 1/2 तासानंतर त्याला वाटून घ्यावे.
*कांदा, लसूण, आले यांना सोलून ठेवावे.
*तूप गरम करावे त्यात तेजपान व कच्च्या मसाल्याची फोडणी टाकावी.
*चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात थोडेसे पाणी टाकूण मीठ व मसाला परतावा.
*मसाला चांगला परतून झाल्यावर 1/4 भाग मसाला खिम्यात टाकून चांगले मिश्रण एकजीव करावे.
*आता एका कढईत तूप तापत ठेवावे व त्यात खिम्याची भजी तळावीत.
*आता उरलेल्या मसाल्याची आमटी बनविण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेवावे. 4-5 उकळी आल्यावर त्यात तयार भजी टाकून 2-3 उकळी आणून गरमा गरम मटणचे कोफ्ते पोळीसोबत सर्व्ह करावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -