घरलाईफस्टाईलसेल्फीसाठी नाकाच्या शस्त्रक्रियेची क्रेझ

सेल्फीसाठी नाकाच्या शस्त्रक्रियेची क्रेझ

Subscribe

सध्या १८ ते २५ या वयोगटातील तरुणांमध्ये असलेल्या सेल्फीच्या वेडामुळे नाकामध्ये सुधारणा करणार्‍या नॉन सर्जिकल र्‍हायनोप्लास्टीला खूप मागणी आहे. नाक हा चेहर्‍याचा अत्यंत महत्त्वाचा अवयव असतो. नाकामुळे त्या व्यक्तीला आत्मविश्वास तरी प्राप्त होतो किंवा याच नाकामुळे आत्मविश्वास गमावलाही जातो. नाकांचे अनेक प्रकार असतात. सपाट नाक, ठळक नाक, बाकदार नाक, थोडेसे वाकडे नाक, घुमटदार नाक इत्यादी प्रकार अस्तित्वात असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या नाकांसाठी एकाच प्रकारची उपचारपद्धती नाही.

उपचारांसाठी लागणारा कमी कालावधी, लगेच होणारी शस्त्रक्रिया आणि रिव्हर्सेबिलिटी (स्थिती पूर्ववत करण्याची क्षमता) यामुळे चेहर्‍याच्या कायाकल्पासाठी नॉन-सर्जिकल उपचारपद्धतींना मागणी असते. या उपचारपद्धती स्वस्त असल्याने अतिरिक्त फायदा होतो. नॉन-सर्जिकल र्‍हायनोप्लास्टीची मागणी वाढत आहे, पण त्याचा उपयोग मर्यादित आहे आणि त्याच्या अनेक मर्यादाही आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक कॉस्मेटिक फिजिशिअनचे नाकाबद्दल स्वतःचे मूल्यमापन आणि उपचार नियोजन असते. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती नॉन-सर्जिकल र्‍हायनोप्लास्टी करण्यासाठी जाते तेव्हा त्याला किंवा तिला सारखाच परिणाम मिळेल, असे कदाचित होणार नाही.

- Advertisement -

नॉन-सर्जिकल उपचारपद्धतीत फिलर्सचा उपयोग
नॉन-सर्जिकल उपचारपद्धती वापरून नाकाचा आकार सुधारायचा असेल तर फिलर्सचा उपयोग करावा लागतो. ते शोषले जाऊ शकतात आणि ते ह्यालुरॉनिक अ‍ॅसिडपासून तयार झालेले असतात, जे बहुधा पेशींमध्ये ब्लॉक्स बांधण्यासाठी थोड्या प्रमाणात अस्तित्वात असते. ह्यालुरॉनिक अ‍ॅसिड फिलर्स वेगवेगळ्या मॉलिक्युलर वजनामध्ये उपलब्ध असतात आणि त्यानुसार त्यांना शोषण्यास लागणारा कालावधी ठरत असतो. फिलर जेवढे जाड (जड मॉलिक्युलर वेट) असेल तेवढे दीर्घकाळ ते टिकून राहील आणि ते इंजेक्ट करण्यासाठीसुद्धा तेवढ्याच जाड सुयांची आवश्यकता असते. भारतीयांच्या नाकाची ठेवण सुधारण्यासाठी खूप प्रमाणात फिलर्सची आवश्यकता असते.

नॉन सर्जिकल र्‍हायनोप्लास्टीमधील जोखीम
नॉन सर्जिकल र्‍हायनोप्लास्टी ही किमान छेद देऊन करण्यात येणारी उपचारपद्धती असली तरी त्यातही जोखीम आणि गुंतागुंत आहेच. नाकामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तवाहिन्या असतात म्हणजे रक्तवाहिन्यांची कमान असते, ज्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांशी जोडलेल्या असतात आणि जीवाणू किंवा फिलर्सना रक्तप्रवाहात आणण्याचे कार्य मेंदू करत असतो. नाकाला देण्यात येणार्‍या इंजेक्शनमध्ये सर्वात मोठी गुंतागुंत म्हणजे अंधत्वाची शक्यता आणि/किंवा नाकाची त्वचा किंवा नाकाच्या बाजूची त्वचा निघून जाणे. इंजेक्ट केलेल्या फिलर्समुळे रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे रक्तपुरवठ्यामध्ये कमतरता येऊ शकते. अंधत्व हे बहुधा एका डोळ्यात येते आणि त्यावर उपचार करता येत नाहीत. नाकावरील त्वचा निघून गेल्याने नाकामध्ये व्यंग निर्माण होते आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. ती केली नाही तर नाकाचे व्यंग तसेच राहते.

- Advertisement -

गुंतागुंत टाळणारी नॅव्हिगेशन यंत्रणा
नाकातील रक्तवाहिन्यांची संख्या खूप असते आणि त्या अत्यंत पातळ असतात आणि एका विशिष्ट भागात असतात. इंजेक्ट करण्यासाठी योग्य भाग निश्चित करणे कठीण असते आणि म्हणूनच या संभाव्य गुंतागुंतींपासून उच्च दर्जाची सुरक्षितता देणे अशक्य असते. अशाप्रकारची अनुचित गुंतागुंत घडू नये यासाठी ते नॅव्हिगेशन यंत्रणेचा उपयोग करतात. नाकाचे विविध पृष्ठभाग आणि नाकातील रक्तवाहिन्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ते इंटर्नल इमेजिंगचा वापर करतात. फिलर्स इंजेक्ट करताना सुई या रक्तवाहिन्यांपासून लांब ठेवली तर मोठ्या गुंतागुंती निर्माण होत नाहीत. नाकाच्या प्रत्येक पृष्ठभागावरील फिलरचे प्रमाण नॅव्हिगेशन सिस्टिम मोजू शकते आणि किती फिलर राहिले आहे हेही ते सांगू शकते. ही नॉन-इन्व्हेसिव्ह (छेद द्यायची गरज नसलेली) प्रक्रिया आहे आणि यामुळे प्रक्रियेच्या वेळेत आणि खर्चात अजिबात वाढ होत नाही. नॉन-सर्जिकल र्‍हायनोप्लास्टी करून घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व पेशंट्सना ही सुरक्षा सुविधा आम्ही उपलब्ध करून घेतो आणि वर नमूद केलेल्या गंभीर गुंतागुंती टाळतो. अखेर, डोळे गमावण्यापेक्षा अतिरिक्त सुरक्षेचे उपाय कधीही चांगले असतात.

मोहन थॉमस, वरिष्ठ कॉस्मेटिक सर्जन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -