घरलाईफस्टाईलआता अनेक आजारांवर एकच औषध

आता अनेक आजारांवर एकच औषध

Subscribe

हृदयासंबंधी रोग, मानसिग रोग तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढविणारे हे औषध नुकतेच मुंबईत लाँच करण्यात आले. या औषधाला आरोग्य विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

वेगवेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे औषध न घेता एकच औषध घेता आले तर किती बरे होईल? असा विचार प्रत्येकाच्याच मनात येतो. मात्र हे विधान आता खरे ठरले असून अनेक आजारावर “Kds4” हे एकच औषध उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हृदयासंबंधी रोग, मानसिग रोग तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढविणारे हे औषध नुकतेच मुंबईत लाँच करण्यात आले. या औषधाच्या व्यापारीकरणाला आरोग्य विभागाने हिरवा कंदिल दाखवला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देखील मेडिसिन फॉर वन हेल्थला चालना दिली आहे. या औषधाचा ठराविक डोस गंभीर रोगाच्या उपचाराकरिता उपयुक्त ठरणार असून युएस, सिंगापूर आणि अफ्रिकेतील रुग्णांवर याची यशस्वी चाचणी देखील पार पडली आहे.

चाचणीतून सकारात्मक प्रतिसाद

या चाचणीतून रुग्णांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. है औषध विविध रोगांवर उपचार करू शकते तसेच हे औषध स्पॉंडीलायटिस, स्लीप डिस्क, स्नायुंसंबंधी रोगांवर प्रभावी उपचाराकरिता उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रीया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अखवारी शंकर यांनी व्यक्त केली. आतापर्यंत दहा लाख रुग्णांना या औषधाने बरे केले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत असून त्यावर अचूक उपचार केल्यास नक्कीच फायदा होईल असेही डॉ अखवारी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -