घरलाईफस्टाईलचमकदार आणि लांबसडक केसांसाठी 'कांदा हेअर पॅक'

चमकदार आणि लांबसडक केसांसाठी ‘कांदा हेअर पॅक’

Subscribe

चमकदार आणि लांबसडक केसांसाठी, नक्की ट्राय करा.

सध्या वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अशा दिवसात त्वचेसोबत केसांचीही काळजी घ्यायला हवी. मात्र, बऱ्याचदा आपण त्वचेची काळजी घेतो आणि केसांची घेतच नाही. त्यामुळे आज तुमच्यासाठी काही खास उपाय आणले आहेत. त्यामुळे तुमचे चमकदार आणि लांबसडक केस अधिक छान राहण्यास मदत होईल. पाहुया असे काही कांद्याचे हेअर मास्क

कांदा आणि मध

- Advertisement -

२ चमचे कांद्याच्या रसात एक चमचा मध घालावे. हे तयार मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. साधारण ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.

कांदा आणि लिंबू

- Advertisement -

२ चमचे कांद्याच्या रसात एक चमचा लिंबू रस मिश्रित करा. हे मिश्रण केसावर लावा आणि एका तासानंतर केस स्वच्छ करा.

कांदा आणि बीअर

एका वाटीमध्ये दोन चमचे बीअर आणि २ चमचे कांद्याचा रस मिश्रित करा. हे मिश्रण केसाला लावून ३० मिनिटे तसेच ठेवा. नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून चांगले कोरडे करा. यामुळे केस गळती थांबते.

कांदा आणि दही

केस गळत असल्यास कांद्याच्या रसात दोन चमचे दही मिश्रित करा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा. यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते.

कांदा आणि खोबरेल तेल

दोन चमचे खोबऱ्याच्या तेलात एक चमचा कांद्याचा रस मिश्रित करा. हे मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. हे मिश्रण रात्रभर तसेच लावलेले ठेवा आणि सकाळी केस स्वच्छ धुवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -