दागिने बोलतात

तुमच्या दागिन्यांना बोलू द्या

mumbai
Jewelry

सणासुदीला किंवा विशेष दिवसाच्या निमित्ताने, संपूर्ण देशभरातील महिला कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात. या उत्सव ऋतूमध्ये पारंपरिक दागिन्यांसह, आधुनिक डिझाईनही उत्तम शोभून दिसतात. याबद्दल , कॅरेटलेच्या डिझाइन हेड प्रज्ञा म्हस्के यांनी दागिन्यांची माहिती दिली आहे.

झुमका : या सनासुदीच्या काळामध्ये स्वतःच्या मालकीचे झुमके असायलाच हवेत. इंडो-वेस्टर्न स्कर्ट किंवा उत्कृष्ट दर्जेदार पारंपरिक पोशाखांद्वारे आपण त्यासोबत मॅच करू शकतो. ऑफिस पार्टी किंवा एखाद्या अनौपचारिक कार्यक्रमासाठी देखील आपण झुमके निश्चितपणे वापरू शकतो. कॅरेटलेनमध्ये, आपण आधुनिक आणि कमी वजनाचे झुमके खरेदी करू शकता जे सुंदर दिसतात आणि आरामदायक देखील असतात.

चांदबाली : तुम्हाला स्वतःची अशी छाप पडायची आहे का ? चांदबालीची एक स्टायलिश जोडी निवडा. ते तुमचा लुक खुलवतानाच आपला आधुनिक पार्टी ट्रेंड एक पाऊल पुढे ठेवण्यास मदत करेल. जेथे आपण रात्रीच्या ड्रेसवर घालू शकता. कॅरेटलेनवर अनेक प्रकारच्या चांदबाली उपलब्ध आहेत. त्याचसोबत आपण परिधान केलेल्या कोणत्याही कपड्यांवर शोभून दिसतील.

बांगड्या: बांगड्या नेहमीच भारतीय उत्सव आणि संस्कृतीला समानार्थी आहेत आणि आता, पारंपरिक कडा, हीरेजडित बांगड्या किंवा रंगीबेरंगी रत्नजडित बांगड्या असे अनेक पर्याय बांगड्या निवडण्यासाठी आहेत. कॅरेटलेनमध्ये, आपण 3D उघडण्याजोग्या बांगड्या बघू शकता जे फॅशनेबल आहेतच. शिवाय मोहक आणि सुबकही दिसतात. आपण पुजेसाठी कडा किंवा हिरव्या बांगड्यांसह अप्रतिम स्टाईल करू शकता. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत एकत्रितपणे आधुनिक डिझाइन आणि रत्नजडित बांगड्या वापरून देखील प्रयोग करू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here