सिगारेट फुंकाल… तर फिटनेसला मुकाल

smoking causes muscle loss
फोटो प्रातिनिधीक आहे

सिक्स पॅक्ज अॅब्ज, स्लिम फिगर हल्ली कोणाला नकोय? त्यासाठी कामाचे तास सांभाळून अनेक जण जीम करतात. तर काही लोक बिझी शेड्युलचा ताण कमी करण्यासाठी ‘… फिक्र को धुवे मे उडाता चला गया’ म्हणत अनेकजण सिगरेटचे झुरके मारतात. तुम्ही पण सिगरेटचे झुरके मारत असाल, तर थोड थांबा ! ही सिगरेटच तुमच्या फिटनेसचा घात करत आहे.

२ तास जीममध्ये घाम गाळून पिळदार शरीर, सिक्स पॅक्ज अॅब्ज बनवणाऱ्या तरुणांची संख्या अधिक झाली आहे. त्यामुळे पहाटे ५ पासून ते रात्री १० वाजेपर्यंत जीममध्ये गर्दी हमखास असते. घड्याळ्याच्या काट्यावर धावत फिट राहण्याचा ‘कीडा’ तुमच्यात आहे आणि तुम्ही सिगरेट फुंकत असाल तर तुम्ही जीममध्ये गाळलेला घाम फुकट जातोय. कारण ‘सिगरेटचा धुवा’ तुमचे शरीर फिट नाही तर कमजोर करत आहे.

रक्त वाहिन्यांची संख्या कमी होते

शरीर चांगलं दिसण्यासाठी स्नायू चांगले असणे गरजेचे असते. पण सिगारेट थेट तुमच्या स्नायूंना हानी

gym--fitness-centre-insurance-900x500
फोटो प्रातिनिधीक आहे

पोहोचवते. आता ही हानी कशी ? ज्यावेळी तुम्ही सिगारेटचा झुरका घेता तेव्हा तो धूर थेट स्नायूतील रक्त वाहिन्यांमध्ये मिसळतो आणि हळुहळु रक्तवाहिन्यांची संख्या कमी करतो. पिळदार शरीरासाठी महत्त्वाचे असणारे स्नायूच सिगारेटमुळे निकामी होऊ लागतात.

व्यायामक्षमतेवर परिणाम

स्नायू कमजोर झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम व्यायाम क्षमतेवर होतो. सिगारेटच्या धुरामुळे रक्तवाहिन्यांची संख्या कमी झालेली असते. सिगारेट सतत फुंकल्याने फुफ्फुसांना सूज येते. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. पर्यायी स्नायूंना बळकटी नसल्यामुळे व्यायाम करताना लवकर थकवा येतो.

चयापचय क्रियेत बिघाड

सिगारेटमुळे तुमची भूक मंदावते. त्यामुळे जीमसाठी लागणारा ‘डाएट’ घेण्यास अडथळा येतो. साधारणत: डाएटमध्ये अंडी, दूध, चिकनचा समावेश असतो. पण खाण्याची इच्छाच नसल्यामुळे तुमचा डाएट नीट होत नाही. त्यामुळे व्यायामाचा कोणताही सकारात्मक बदल तुम्हाला शरीरात दिसून येत नाही.

४ हजार सिगरेट नंतर ‘हे’ होईल

या संदर्भात कॉलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिआगो विद्यापीठ, कोची विद्यापीठ यांनी एकत्र येऊन संशोधन केले आहे. ८ आठवडे ४ हजार सिगारेटचा शरीरावर काय परिणाम होतो. याचा अभ्यास त्यांनी केला. या अभ्यासाअंती सिगारेट स्नायू कमजोर करत असल्याचे निदर्शनास आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here