घरलाईफस्टाईलपनीर कॅप्सिकम रेसिपी

पनीर कॅप्सिकम रेसिपी

Subscribe

झटपट पनीर कॅप्सिकम रेसिपी

बऱ्याचदा आपण पनीरची भाजी खातो. मात्र, त्यात नेहमी काहीतरी वेगळेपण असावे असे आपल्याला वाटत असते. त्यातीलच एक रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती म्हणजे ‘पनीर कॅप्सिकम’ रेसिपी.

साहित्य

- Advertisement -
  • पनीर (बोटासारखे लांब तुकडे करुन घेणे)
  • भोपळी मिरची (बोटासारखे लांब तुकडे करुन घेणे) – पनीर आणि भोपळी मिरची समप्रमाणात असावी.
  • बारीक चिरलेला टोमॅटो पाव वाटी
  • आलं-लसूण पेस्ट- एक ते दिड टीस्पून
  • धणे- एक ते दिड टीस्पून
  • लाल मिरच्या-अंदाजे
  • कसूरी मेथी- एक टीस्पून
  • मीठ-चवीप्रमाणे
  • कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम तेलावर उभी चिरलेली भोपळी मिरची परतून झाकण घालून शिजवावी. जरा मऊ वाटली की आलं-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा एक वाफ काढावी. धणे-लाल सुक्या मिरच्या आणि कसूरी मेथी मिक्सरला वाटून पावडर किंवा पाणी घालून पेस्ट करावी. ती ही भाजीत घालावी. सगळ्यात शेवटी पनीरचे तुकडे आणि मीठ घालून शिजवावं. भाजीला खूप रस रहाता कामा नये. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -