घरलाईफस्टाईलखमंग पनीर पकोडा

खमंग पनीर पकोडा

Subscribe

खमंग पनीर पकोडा रेसिपी

सातत्याने कोबीचे पकोडे, कांद्याची भजी आणि बटाटा भजी खाऊन फार कंटाळा आला असेल तर पनीर पकोडा एकदा तरी नक्की ट्राय करा.

साहित्य

- Advertisement -

१ कप बारीक कापलेले पनीर
१ कप आरारोट
१ टिस्पून आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
स्वादानुसार काळीमिरी पावडर
स्वादानुसार सैंधव मीठ
अर्धा टिस्पून साखर
२ टिस्पून दही
१ टिस्पून राजगिरा पीठ
२ टिस्पून दाण्याचा खरबडीत कुट
तेल तळण्याकरता

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम दही, राजगिरा पीठ, सैंधव मीठ, आले, हिरव्या मिरचीची पेस्ट, १ टिस्पून तेल, शेंगदाण्याचा कुट आणि साखर या सर्वांना एकत्रित करुन घ्यावे. त्यानंतर त्यात पनीरचे तुकडे टाकून १५ मिनीटे तसेच राहु दया. त्यानंतर आरारोटमध्ये सैंधव मीठ आणि मीरीपूड मिसळून घट्ट घोळ तयार करा आणि नंतर पनीरला आरारोटच्या घोळात बुडवून गरम तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -