पपईच्या खुसखुशीत पुऱ्या

पपईच्या खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी

Mumbai
papaichya purya recipe in marathi
पपईच्या खुसखुशीत पुऱ्या

पुरी बऱ्याचदा रवा आणि कणीकपासून केली जाते. मात्र, आज आम्ही तुम्हाला पपईपासून पुरी कशी तयार करायची ते सांगणार आहोत.

साहित्य –

एक वाटी पिकलेल्या पपईचा गर, दीड वाटी कणीक, हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा तिखट, पाव चमचा धणे-जिरे पूड, एक चमचा तीळ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल

कृती –

पुऱ्यांकरता पपई ही पिकलेली घ्यावी आणि सर्व साहित्य टाकण्याआधी पपई छान घोटून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये पपईचा गर घेऊन त्यामधे कणीक, हिंग, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, तीळ, एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालून घट्ट गोळा मळून घ्यावा. नंतर त्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करुन पुऱ्या तयार करुन हलक्या लाल रंगावर तळून घ्याव्या. या गरमागरम पुऱ्या आवडीच्या भाजीसोबत सर्व्ह कराव्यात.