कुरकुरीत पेपर डोसा

Mumbai
paper dosa recipe
कुरकुरीत पेपर डोसा

नेहमीचा नाश्ता करुन फार कंटाळा येतो अशावेळी काहीतरी वेगळे खावेसे वाटते. अशावेळी जर तुम्ही कुरकुरीत पेपर डोसा नक्की खाऊ शकता. चला तर पाहुया कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा.

साहित्य

दीड कप साधे तांदूळ
दीड कप उकडे तांदूळ
१ चमचा मेथी
१ टेबलस्पून चण्याची डाळ
पाव कप गहू

कृती

सर्व साहित्या ३-४ तास भिजत ठेवा. त्यानंतर सर्व साहित्य बारीक वाटून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ मिसळून ८ तास ठेवा. नंतर तुम्हाला पीठ वर आलेले दिसेल. नंतर तुम्ही डोसा बनवा. हा कुरकुरीत डोसा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा भाजीसोबत देखील खाऊ शकता.

टीप

तवा तापल्यावर थोडे पाणी शिंपडून आणि तवा गॅसवरून खाली काढून पीठ पसरा, म्हणजे डोसा पातळ बनेल. तवा फार गरम असल्यास पीठ शिजते. त्यामुळे पीठ झटपट पसरता येत नाही म्हणून प्रत्येक डोसा तयार केल्यानंतर पाणी शिंपडणे फार गरजेचे आहे.