घरलाईफस्टाईलचहा पिणारे लोकं क्रिएटीव्ह असतात

चहा पिणारे लोकं क्रिएटीव्ह असतात

Subscribe

चहा पिणारे लोकं क्रिएटीव्ह आणि स्पष्ट विचारांचे असतात, असा दावा चीनमधील पेकिंग विद्यापिठामधील एका अभ्यासकांनी मांडला आहे.

सकाळ झाली की सुरुवात होते ती एका चहाच्या घोटाने. तसेच कोणत्याही वेळी चहा विचारल्यानंतर बरीच मंडळी हो चहा हवा असे देखील उत्तर देतात. त्याचप्रमाणे चहा हे भारतामधील सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आहे. मात्र सध्याची तरुण पिढी चहा पित नाही. मात्र ज्या व्यक्ती चहा पितात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चहा प्यायल्याने एकाग्रता वाढते ज्यामुळे मनामधील अनेक गोष्टींबद्दलचे विचार अधिक स्पष्ट होतात, असं एका अभ्यासामध्ये समोर आले आहे. चीनमधील पेकिंग विद्यापिठामधील एका अभ्यासानंतर हा निष्कर्ष अभ्यासकांनी मांडला आहे.

- Advertisement -

चहामधील या घटकांमुळे व्यक्ती सतर्क आणि सजग राहते

राजधानी बिजिंगमधील पेकिंग विद्यापिठामधील अभ्यासकांनी केलेल्या संशोधनामध्ये चहामधील कॅफीन आणि थेनीनचा मेंदूमधील क्रिएटीव्ह विचारशक्तीशी कसा संबंध आहे याबद्दलही अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे. या अभ्यासामध्ये असे समोर आले आहे की, चहा प्यायल्यानंतर लगेचच व्यक्तीच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात असंही या अभ्यासा नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -