नाश्ता रेसिपी : फोडणीचा पाव

फोडणीचा पाव रेसिपी

Mumbai
phodnicha pav recipe
नाश्ता रेसिपी : फोडणीचा पाव

बऱ्याचदा नाश्ता काहीतरी वेगळा करावा, असे बऱ्याचदा वाटत असते. मात्र, काय करणार असा प्रश्न पडतो आणि आपण ब्रेड किंवा पाव खाऊन नाश्ता करतो. परंतु, जर तुम्हाला नुसता ब्रेड अथवा पाव नुसता सकाळी नाश्त्याला खाण्यापेक्षा तुम्ही त्याला फोडणी देऊन खाल्लंत तर अधिक चांगली चव येते. शिवाय यामध्ये तुम्हाला हवे तसे हेल्दी पदार्थ तुम्ही घालू शकता.

साहित्य

  • ब्रेड अथवा पाव
  • तेल
  • कांदा
  • चवीनुसार मीठ
  • मिरची
  • कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम ब्रेड अथवा पाव व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यानंतर त्यावर तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला. एका कढईत तेल ओता. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्ता, चिरलेला कांदा आणि मिरच्यांचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या. कांदा शिजत आल्यावर वरून ब्रेड अथवा पावाचा चुरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. नंतर वरुन चिरलेली कोथिंबीर पेरा आणि एक वाफ काढून गरमगरम ब्रेड व पाव सॉसबरोबर खायला द्या.


हेही वाचा – सर्दी – खोकल्यासह इतरही समस्यांवर ‘काळी मिरी’ लाभदायक