घरलाईफस्टाईलअननस मिल्क शेक

अननस मिल्क शेक

Subscribe

हिवाळ्याच्या दिवसात अननस बाजारात दाखल होतात. त्यामुळे अनेकजण अननसाचे सेवन करतात. पण, केवळ अननस खाण्या व्यतिरिक्त त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील आपण करु शकतो. चला तर जाणून घेऊया अननस मिल्क शेकची रेसिपी.

साहित्य

- Advertisement -
  • १ ग्लास थंड दूध
  • २ केळी
  • अननसाचे तुकडे
  • बर्फाचे क्यूब
  • ४ चमचे पिठीसाखर
  • काजू,बदामाची पूड
  • वेलची पूड
  • १ चमचा व्हॅनिला इसेन्स

कृती

सर्वप्रथम अननसाचे बारीक काप करून घ्यावे. त्यानंतर अननस आणि केळे मिक्सरमध्ये चांगले एकजीव फेटून घ्यावे. नंतर त्यात दूध, व्हॅनिला इसेन्स, बर्फाचे तुकडे एकत्र घालून घ्यावे. नंतर दुधामध्ये वेलची पावडर, व्हॅनिला इसेन्स, बर्फाचे क्यूब, काजू, बदाम पेस्ट, साखर घालून घ्यावी. नंतर मिक्सर मधून चांगले फिरवून घ्यावे. अशाप्रकारे अननस मिल्क शेक तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -