Tuesday, April 16, 2024
घरमानिनीKitchenBatata Pakoda : झटपट बनवा बटाटा पकोडा

Batata Pakoda : झटपट बनवा बटाटा पकोडा

Subscribe

बऱ्याचदा घरी अचानक पाहुणे आले की त्यांना नाश्ता काय द्यावा असा अनेकांना प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही अवघ्या 5 मिनिटात झटपट बटाटा पकोडा तयार करु शकता. चला तर पाहुया क्रिस्पी बटाटा पकोडा रेसिपी.

साहित्य : 

  • 4 कच्चे बटाटे
  • 3/4 मिरच्या
  • 4 चमचे आरारुट
  • 4 चमचे मैदा
  • तळण्यासाठी तेल
  • चिमूटभर हळद
  • चिमूटभर मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी

कृती : 

Batata Bhaji | Crispy fried potato | IAloo Pakora Recipe| Aloo Bhajiya  Street Food - YouTube

  • सर्वप्रथम कच्चे बटाटे पाण्यात बारीक किसून घ्यावे. त्यानंतर ते भिजून काढावे.
  • नंतर त्यात मिरची, हळद, मीठ, आरारुट, मैदा एकत्र करुन एकजीव करुन घ्यावे.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे आणि नंतर त्याचे पकोडे करुन तेलात सोडावे.
  • गरमागरम खुसखुशीत पकोडे सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

हेही वाचा :

Nacho Chips : तांदळाच्या पिठापासून बनवा ‘नाचो चिप्स’

- Advertisment -

Manini