लाभदायक नारळ पाणी

Mumbai
coconut water
नारळ पाणी

नारळ पाण्यात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि खनिज तत्व भरपूर प्रमाणात असतात. नारळाच्या पाण्याने केवळ शरीरास सगळे घटक मिळतात असे नाही तर, इतरही समस्यांपासून बचाव होतो. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरते. त्यामुळे लहान मुलांपासून ते आबालवृद्धांनी नारळपाणी प्यायल्यास आरोग्यास फायदेशीर ठरते. रोज १ नारळ पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्याकरता मदत करते. तसेच ग्लुकोजची कमी देखील नारळ पाणी पूर्ण करते. नारळ पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते.

नारळ पाण्याचे अन्य काही फायदे

शरीरात नवीन ऊर्जा निर्माण करण्यास मदत होते. जर तुमचे डोके दुखत असेल तर नारळ पाणी प्या.

नारळ पाण्यात फॅटचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रणात राहते. त्यातील पोषक घटकामुळे भूक कमी लागते. त्यामुळे जेवण नियंत्रित राहते. तसेच वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी लाभदायक ठरते.

नारळ पाणी प्यायल्याने त्वचेला हायड्रेटेड आणि मॉश्चराईज्ड करण्यास मदत करते. त्यामुळे नारळ पाणी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. चेहर्‍यावरील डाग नाहीसे करण्यास तसेच त्वचा उजळण्यासाठी नारळाचे पाणी फायदेशीर ठरते.

नारळ पाणी प्यायल्याने पचनाच्या तक्रारी कमी होतात. नारळाच्या पाण्यापासून शरीराला पोषक घटक मिळतात. म्हणून ते पचन क्रियेसाठी लाभदायक ठरते.

नारळ पाण्यात शरीराला आवश्यक असणारी पोषक घटक भरपूर असतात. यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम यांची मात्रा सर्वाधिक असल्याने मोठ्या प्रमाणात पोषक घटक मिळतात.