घरलाईफस्टाईलसूर्यकिरणांपासून करा मुलांचे संरक्षण - भाग २

सूर्यकिरणांपासून करा मुलांचे संरक्षण – भाग २

Subscribe

सनस्क्रीन निवडताना

सहा महिन्यांखालील बाळांना सनस्क्रीन लावू नका. बाळांना सनस्क्रीन लावणे आवश्यकच असेल तर SPF१५ किंवा कमी असलेले सर्व प्रकारच्या अतिनील करिणांपासून संरक्षण करणारे सनस्क्रीन वापरा. कान, नाक, कपाळावरील केसांची कडा अशा सर्व उघड्या भागांवर सनस्क्रीन लावा. लहान मुलांसाठी ३०SPF असलेले सनस्क्रीन वापरा आणि तोंडाचा बचाव करण्यासाठी ३०SPF असलेला लिप बाम लावा.

तुमच्या मुलांसाठी आणि बाळांसाठी जे सनस्क्रीन वापरता ते सनस्क्रीन तुम्हीही वापरू शकता, पण मोठ्यांसाठी असलेले सनस्क्रीन तुम्ही मुलांना लावू नये. बाळांसाठी आणि मुलांसाठी असलेल्या सनस्क्रीनमधील घटक हे मोठ्यांसाठी असलेल्या सनस्क्रीनपेक्षा वेगळे असतात. बाळांसाठीच्या सनस्क्रीनमध्ये टायटेनिअम डायऑक्साइड किंवा झिंक ऑक्साइड असते. जे त्वचेमध्ये शोषले जात नाहीत आणि फक्त सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी पातळ थर तयार करतात. मोठ्यांसाठीच्या सनस्क्रीनमध्ये अधिक रसायने असतात आणि झिंक ऑक्साइडचे सूक्ष्म कण असतात. बाळांसाठी आणि मुलांसाठी असलेल्या सनस्क्रीनने त्वचेवर पांढर्‍या रंगाचा थर लावला जातो आणि तो शोषला जात नाही. तुम्हालाही तसा सफेद पेस्टसारखा लुक चालत असेल तर तुम्हीही तेच सनस्क्रीन लावू शकता.

- Advertisement -

असा करा सनस्क्रीनचा वापर

उन्हात जाण्याच्या २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन भरपूर लावा, त्यात कंजुषपणा करू नका. सनस्क्रीन तुमच्या हाताच्या तळव्यांवर घ्या आणि शरीराच्या उघड्या भागावर एक एक ठिपका लावा आणि पसरवा. कान, नाक, पायाचा मागचा भाग, पावलांच्या आणि हाताच्या वरच्या भागावर लावण्यास विसरू नका.

मुले बाहेर असतील तर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा. घातक सूर्यकिरण दरवाजे आणि खिडक्यांमधूनही येऊ शकतात. मुलांच्या चेहर्‍याला सनस्क्रीन लावताना त्यांच्या डोळ्यांभोवती सनस्क्रीन काळजीपूर्वक लावा. तुम्ही ते पूर्णपणे पसरवा, जेणेकरून डोळ्यात जाणार नाही.

- Advertisement -

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्यात जाण्यापूर्वी जलरोधक सनस्क्रीन लावा. जेव्हा जेव्हा तुमचे मूल पाण्याच्या बाहेर येईल, तेव्हा तेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. तुमचे मूल ८ मिनिटांपेक्षा अधिक काळ पाण्यात असेल तरी तुम्ही त्याला पुन्हा सनस्क्रीन लावा.

ऑरगॅनिक सनस्क्रीन वापरण्यासाठी एकदम सुरक्षित असतात कारण ते घातक सूर्यकिरणांना प्रतिबंध करतात आणि त्वचासुद्धा चुरचुरत नाही.

डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटोसर्जन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -