घरलाईफस्टाईलसूर्यकिरणांपासून करा मुलांचे संरक्षण - भाग १

सूर्यकिरणांपासून करा मुलांचे संरक्षण – भाग १

Subscribe

थोडेसे ऊन गरजेचे असते. जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा आपले शरीर ड जीवनसत्व तयार करते. बळकट आणि सुदृढ हाडांसाठी कॅल्शिअम शरीरात शोषून घेण्यास ड जीवनसत्व मदत करते. आपल्या मुलाने दिवसभर, विशेषतः उन्हाळ्यात बाहेर राहणे गरजेचे आहे, असा याचा अर्थ नाही. उन्हाळ्यात फार काळ बाहेर राहिलो तर डोळ्यांना इजा होऊ शकते, सनबर्न, डिहायड्रेशन, प्रतिकार क्षमता कमकुवत होणे, सुरकुत्या, त्वचेचे वय अधिक वाटणे आणि त्वचेचा कर्करोग यासारखे आजार होऊ शकतात.

कडक उन्हाळ्यात तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचाविकार होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातही मुलांची त्वचा नाजूक असते. बाळांची त्वचा पातळ असते आणि त्वचेमधील मेलॅनिन विकसित होत असते. म्हणून उन्हात थोडा काळ जरी राहिले तर त्यांची त्वचा लगेचच पोळते. सहा महिन्यांखालील मुलांना उन्हात नेणे शक्य तितके टाळावे. बाळाला पूर्णपणे झाकणारे कपडे घालावेत. रुंद कडा असलेली हॅट, लांब बाह्यांचे टॉप्स, छत्री इत्यादीचा वापर करावा जेणेकरून त्वचेला फार ऊन लागणार नाही.

- Advertisement -

‘सन स्मार्ट’ होण्यासाठी करा हे उपाय

 सनस्क्रीन पुन्हा पुन्हा लावा.
• जेव्हा मुले बाहेर जातील तेव्हा त्यांनी संपूर्ण अंग झाकणारे कपडे घातले असतील याची खातरजमा करा.
• त्यांना टोपी आवडत नसेल तर छत्री सोबत बाळगा.
• त्यांना हायड्रेटेड ठेवा. मुले बाहेर असतील तेव्हा ते पुरेसे पाणी पितील याची खातरजमा करून घ्या.
• घरात असतानाही सनस्क्रीन लावावे.

मुलांसाठी सनस्क्रीन घेताना 

• मुलांसाठी वॉटरप्रूफ फॉर्म्युला असलेले सनस्क्रीन शोधा.
• हायपोअ‍ॅलर्जिक घटक असलेले सनस्क्रीन विकत घ्या.
• सर्व प्रकारच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे सनस्क्रीन घ्या.
• कीटक दूर पळविणारे घटक असलेले सनस्क्रीन टाळा.

- Advertisement -

डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटोसर्जन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -