घरलाईफस्टाईलमुलांच्या हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी काय करावे?

मुलांच्या हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी काय करावे?

Subscribe

आपल्या मुलांच्या हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे महत्त्वाचे असते. मात्र, ही काळजी कशी घ्यावी. चला तर जाणून घेऊया कशी घ्यावी मुलांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी.

अलीकडच्या काळात लोकांमध्ये आरोग्याविषयीची जागरुकता वाढताना दिसत आहे. प्रत्येक जण जिमसाठी वेळ काढत आहे किंवा विशिष्ट डाएट पाळण्याच्या प्रयत्नात आहे. पण हे करत असताना आवर्जून लक्षात ठेवण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे हृदय निरोगी ठेवण्यासाठीच्या चांगल्या सवयी या लहानपणापासूनच लागायला हव्यात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रौढपणी हरत-हेने आपले आरोग्य परत मिळविण्यावर लक्ष केंद्रित करणारे मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र त्यांना चांगलंचुंगलं खायला देण्यापुरताच आपला दृष्टिकोन मर्यादित ठेवतात. मुलांसाठी हे खूपच अन्यायकारक आहे, कारण हृदयाच्या दुखण्यांची बीजे ही बालपणात आणि किशोरवयातच पेरली जातात. शाळकरी मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण २९% असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. मुंबईतही हा आकडा थोड्याफार फरकाने सारखाच असणार. लठ्ठ मुले ही आपल्या प्रौढपणातही लठ्ठच राहण्याची मोठीच शक्यता असते! आपल्याला मान्य असो किंवा नसो, पण मुलांच्या मनावर चांगल्या जीवनशैलीच्या सवयी बिंबविण्यामध्ये आईची भूमिका महत्त्वाची असते. मुलांसाठीच्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठीच्या काही चांगल्या सवयींची माहिती आपण करून घेऊ; मात्र जीवनशैलीतील हे बदल संपूर्ण कुटुंबाने स्वीकारले तरच ते यशस्वी होऊ

शकतात हे लक्षात ठेवायला हवे. याचे साधेसे कारण म्हणजे, मुले तुमच्या सांगण्यावरून नव्हे तर तुम्ही कसे वागता हे पाहूनच कसे वागायचे हे ठरवत असतात.

- Advertisement -

पारंपरिक भारतीय आहार हा हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक मानला जातो.

– मसाले

आपण आपल्या जेवणात वापरत असलेल्या बहुतांश मसाल्यांमध्ये काही-ना-काही औषधी गुणधर्म असतात. हृदयासाठी उपयुक्त ठरणारा पण बरेचदा दुर्लक्षित राहणारा एक पदार्थ म्हणजे अळशी (फ्लॅक्ससीड्स) अळशीच्या बिया हलकेच भाजून नेहमीच्या पदार्थांवर पसरता येतील.

- Advertisement -

– तूप

तुपाचे प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे. पदार्थ बनविताना वापरण्यात येणाऱ्या

तेलाचे प्रमाण कमी-कमी करत जाण्याकडे आपला कल हवा. या सवयीची सुरुवासाठी उत्तम मार्ग म्हणजे आपण तेल कधी विकत घेतले आणि ते किती दिवस पुरले याच्या तारखांची नोंद करून ठेवणे. त्यानंतर आधीच्या तेलाच्या डब्यापेक्षा त्यापुढचा डबा एक आठवडाभर तरी अधिक काळ पुरायला हवा. हे लक्ष्य आखून घेता येईल. राइस ब्रॅन, कॅनोला, सूर्यफूल, भुईमूग आणि ऑलिव्ह ऑइल ही तेले हृदयासाठी चांगली मानली जातात. २ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या आहारात समाविष्ट एकूण स्निग्ध पदार्थांचे प्रमाण त्यांना रोजच्या रोज मिळणाऱ्या एकूण कॅलरीजमधील ३०% हून अधिक असता कामा नये.

– डाळी

डाळी, शेंगा, कडधान्ये यांना सुपर फूड मानले गेले जाते. रोजच्या दोन वेळच्या जेवणात डाळीची

वाटी ताटात असायला हवी. सोयाबीन आणि कुळीथ यांचा जेवणात वरचेवर समावेश असायला हवा.

कडधान्ये

मोड आलेली कडधान्ये न्याहारीमध्ये किंवा चाट पदार्थ म्हणून शाळेच्या डब्यात देता येईल.

भाज्या

भारतामध्ये प्रत्येक मोसमात कितीतरी प्रकारच्या ताज्या भाज्यांची भरपूर रेलचेल असते. आपण भारतीय मंडळी सलाड, कोशिंबिरींसारखे हा प्रकार फारसे खात नाही पण त्यातून शरीराला अत्यावश्यक जीवनसत्वे आणि सूक्ष्म पोषक घटकांचा पुरवठा होतो. स्टार्टर म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या या पदार्थांमुळे पोट पुरेसे भरते. सलाडमध्ये ताज्या लिंबाचा रस, चाट मसाला, बदामाचे काप, मनुके, अक्रोड आणि साले काढलेल्या सफरचंदाचे बारीक तुकडे टाकले तर मुलांनाही ते खावेसे वाटेल.

आपल्या मुलांच्या हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे महत्त्वाचे असते. मात्र, ही काळजी कशी घ्यावी. चला तर जाणून घेऊया कशी घ्यावी मुलांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -