घरलाईफस्टाईलहिवाळ्यात अशी घ्या फुप्फुसांची काळजी

हिवाळ्यात अशी घ्या फुप्फुसांची काळजी

Subscribe

फुप्फुसाचा आजार असलेल्या अनेकांसाठी हिवाळा हा ऋतू फारसा चांगला ठरत नाही. हिवाळ्यात श्वसनविकार  कमी करण्यासाठी काही उपाय डॉक्टर सुचवतात.

कडक उन्हाळा आणि त्रासदायक पावसाळ्यानंतर हिवाळ्याचे आगमन झाले आहे. रात्री मोठ्या होत चालल्या आहेत आणि नववर्षाचा रोमांच शिखरावर पोहोचला आहे. मात्र, अनेकांसाठी हिवाळा हा ऋतू फारसा चांगला ठरत नाही. थंड हवामानामुळे अनेक आजार बळावतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम तुमच्या श्वसनमार्गावर होतो. विशेषत: दीर्घकाळापासून फुप्फुसाचे विकार असलेल्यांना हिवाळ्याचा त्रास जास्तच जाणवतो. कोरड्या हवेमुळे रुग्णांच्या श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. घरघर लागते, खोकला येतो आणि धापही लागते.

हिवाळ्यात श्वसनविकार  कमी करण्यासाठी काही उपाय

१. उब राखण्यासाठी पुरेसे गरम कपडे घाला; पोषक आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे तर अत्यावश्यक आहे.

- Advertisement -

२. तुम्हाला दिेलेली औषधे घेण्यास विसरू नका. बदलत्या हवामानाचे संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.

३. तुम्ही दमेकरी (अस्थमाचे रुग्ण) किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज अर्थात सीओपीडीचे रुग्ण असाल, तर काही झटपट आराम देणारी औषधे कायम जवळ बाळगा आणि या आजारांची लक्षणे जाणवू लागल्यास ती त्वरेने घ्या.

- Advertisement -

४. शरीर उबदार राखण्यासाठी शक्य तेवढे क्रियाशील राहा. तुम्ही घरात असलात, तर एक तासाहून अधिक काळ नुसते बसून राहू नका. उठा आणि हालचाल करत राहा.

५. तुमच्या डॉक्टरांकडून फ्लूची औषधे घ्या आणि प्रतिकारशक्ती वाढवा. ते सर्वोत्तम संरक्षण आहे.

६. गरम पेये मुबलक प्रमाणात घ्या आणि शक्य असल्यास दिवसातून एकदा तरी गरम जेवण घ्या. हिवाळ्यात वेळेवर खाल्ले असता ऊर्जा चांगली राखण्यात मदत होते.

थोडीशी काळजी घेतली आणि नियोजन केले, तर हिवाळ्यात निरोगी राहण्याची शक्यता वाढेल असे मत एसआरव्ही ममता रुग्णालयातील फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. संध्या कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -