घरलाईफस्टाईलझणझणीत मुळ्याचा ठेचा

झणझणीत मुळ्याचा ठेचा

Subscribe

असा करावा मुळ्याचा ठेचा.

बऱ्याचदा मिरचीचा ठेचा सर्वांना आवडतो. मात्र, त्यात वेगळेपणा आल्यास जेवणाची लजत अधिकच वाढते. चला तर जाणून घेऊया मुळ्याचा ठेचा.

साहित्य

- Advertisement -
  • दोन मध्यम आकाराचे मुळे
  • ५/८ तिखट हिरव्या मिरच्या
  • पाव लहान चमचा हळद
  • मीठ
  • तेल
  • मोहोरी
  • चिमूटभर हिंग
  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

मुळे स्वच्छ धुवून कीसून घ्यावेत. त्यानंतर त्यात बारीक मिरच्या चिरुन घालाव्यात. नंतर दीड चमचा तेल तापवावं. त्यात मोहोरी घालावी. तडतडली की चिमूटभर हिंग घालावा. लगेच बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. जरा परतून मुळ्याचा कीस घालावा आणि परतून घ्यावे. त्यात चवीपुरतं मीठ घालावं आणि नंतर झाकण ठेवून वाफेवर मुळा शिजवावा. यावर थोडीशी कोथिंबीर पेरावी आणि हवं असल्यास वर लिंबू पिळावं. अशाप्रकारे तुमचा झणझणीत ठेचा तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -