नाचणीचे कुरकुरीत डोसे

नाचणीचे डोसे

Mumbai
ragi flour dosa recipe
नाचणीचे कुरकुरीत डोसे

नाश्ताला करा गरमागरम कुरकुरीत डोसे

साहित्य

१ कप नाचणीचे पीठ
१/२ कप तांदुळाचे पीठ
१/२ कप उडीद डाळ
७ ते ८ मेथी दाणे
चवीपुरते मीठ
डोसा बनवताना थोडे तेल

कृती

सर्वप्रथम नाचणीचे पीठ आणि तांदुळाचे पीठ पाण्यात किमान ५ तास भिजवावे. खूप जास्त पाणी घालू पीठ वड्याच्या पिठाला भिजवतो तसे घट्टसर भिजवावे. तर दुसऱ्या भांड्यात उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्र करून ५ तास भिजत ठेवावे. ५ तासानंतर उडीद डाळीतील पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी. लागल्यास किंचित पाणी घालावे. आता भिजवलेले पीठ आणि उडीद डाळीची पेस्ट एकत्र करावी. लागेल तसे पाणी घालून नेहमीच्या डोसा पिठाला जेवढं पातळ पीठ असते तेवढे पातळ ठेवावे. चवीपुरते मीठ घालावे. नंतर नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर डावभर पीठ घालावे आणि डाव गोलगोल फिरवून डोसा पातळसर पसरवावा. कडेने तेल सोडावे. एक बाजू खरपूस झाली कि डोसा उलटून दुसऱ्या बाजूने निट भाजू द्यावा आणि गरम गरम डोसे चटणी बरोबर सर्व्ह करावे.