व्यक्तीची उंची तिच्या व्यक्तिमत्वामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. उंच व्यक्तींमध्ये आत्मविश्वास अधिक प्रमाणात आढळून येतो. तर कमी उंचीमुळे व्यक्तीमध्ये निराशा जाणवते. ठराविक वयापर्यंत उंची वाढते हे जरी खरे असले तरी संतुलित आहार व व्यायामामुळे काही अंशी उंची वाढण्यास मदत होते.
संतुलित आहार घ्या – शरीराची योग्य वाढ होण्यासाठी संतुलित आहार करणे गरजेचे आहे. जंकफूड, चायनीजसारखे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करावे. कॅल्शियम, प्रोटीनयुक्त आहार घ्या. फळे, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.
भरपूर खा – दिवसातून तीन वेळा जेवण करा. तसेच मधल्या वेळेत फळे व पौष्टिक न्याहारी करा. उंची वाढण्यास गायीचे दूध फायदेशीर ठरते. तेव्हा रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध प्या. त्यामुळे शांत झोप लागण्यासही मदत होते.
लोणी खा – उंची वाढवण्यासाठी 2 काळी मिरी 20 ग्रॅम लोणीसोबत नियमित सेवन करा.
वजन वाढवा – वजन कमी असणे हे उंची न वाढण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे संतुलित आहार केल्याने वजनही वाढेल व उंचीसुद्धा वाढेल.
सूर्यनमस्कार घाला – पहाटे उठून सूर्यनमस्कार घाला. तसेच पहाटेच्या स्वच्छ वातावरणात धावल्याने उत्तम व्यायाम होतो. शिवाय उंची वाढण्यासही मदत होते.
पायाचा अंगठा खेचा – उंची वाढवण्यासाठी अंगठा खेचा. त्यामुळे शरीरातील मांसपेशी ओढल्या जातात.
अश्वगंधाचे चूर्ण खा – अश्वगंधाची मुळे कुटून त्याची बारीक पावडर बनवून ठेवावी. रोज रात्री दुधामधून २ चमचा या पावडरचे सेवन करावे.
आत्मविश्वास वाढवा – कमी उंची आहे म्हणून निराश होऊ नका. उंची न वाढण्याची अनुवंशिक कारणेही असू शकतात. त्यामुळे नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आयुष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास वाढवा आणि आपल्या कर्तृत्वाने समाजात उंची वाढवा.