जाणून घ्या, राखी बांधण्याचा ‘शुभ मुहूर्त’!

हिंदू धर्मात कोणत्याही सणाला शुभ मुहूर्त बघण्याची विशेष पद्धत

Mumbai

नारळी पौर्णिमा तसेच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षा बंधनाचा सण हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाची रक्षाबंधन भारताच्या स्वातंत्र्यादिनी साजरा होत आहे. हा सण भाऊबहिणीमधील प्रेमाचं प्रतीक असल्याचे मानले जाते. रक्षाबंधन म्हणजे सुरक्षेचे बंधन‘. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यात येणाऱ्या अडचणीत मदत करण्याचा तसेच सुरक्षा देण्याचं आश्वासन देतो. श्रावण पैर्णिमेचे अधिक महत्त्व रक्षाबंधनामुळे आहे. तर या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्या बदल्यात भाऊ बहिणीला मी सदैव तुझं रक्षण करीन असा आशीर्वाद देतो.

मात्र, बदलत्या काळानुसार आता रक्षाबंधनाचं स्वरूपही बदलत चालल्याचं दिसत आहे. पूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी केवळ भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देत असे मात्र आता बहिण सुद्धा आपल्या भावाला एखादं गिफ्ट देतात.

राखी बांधण्याचा हाआहे शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात कोणत्याही सणाला शुभ मुहूर्ताला एक खास महत्व असते. प्रत्येक सणांच्या दिवशी मुहूर्त पाहण्याची पद्धत असते. इतर सणांप्रमाणेच रक्षाबंधनाचादेखील शुभ मुहूर्त आहे. हा शुभ मुहूर्त पाहून बहिण आपल्या भावाला राखी बांधते. यंदा रक्षाबंधनासाठी गुरुवारी सकाळी ५.४९ मिनिटांपासून संध्याकाळी ६.०१ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे या काळात बहिण आपल्या भावाला राखी बांधून शकते. म्हणून, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ०५:४९:५९ ते १८:०१:०२ हा असून दिवसांतील २४ तासांपैकी १२ तास ११ मिनिटांचा कालावधी राखी बांधण्यास उत्तम आहे.

यातीन वेळा सोडून तुम्ही बांधू शकतात राखी

१५ ऑगस्टला गुरूवार असल्यानं दुपारी १. ३० ते ३ पर्यंत राहूकाळ आहे. तर, ९ ते १०.३० पर्यंत गुलिल काळ आणि सकाळी ६ ते ७.३० पर्यंत यमगंड काळ असणार आहे. या तीन वेळा सोडून तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी राखी बांधू शकता.