अनेकांना गोड खाण्याची सवय असते. तर बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. अशावेळी तुम्ही घरी बनवलेली रवा नारळ बर्फी नक्की ट्राय करु शकता.
साहित्य :
- 1 मोठे चमचे तूप
- 1/4 कप रवा
- 1/2 कप खवलेला नारळ
- 2 कप दूध
- 1/4 कप साखर
- 1 लहान चमचा वेलची पावडर
- पिस्ताचे काप
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात मंद आचेवर रवा भाजून घ्यावा.
- रवा भाजल्यानंतर त्यात नारळाचा किस घालावा. हे मिश्रण 3 ते 5 मिनिटे आचेवर परतून घ्यावे.
- त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये दूध उकळून त्यात रवा-नारळाचे मिश्रण घालावे. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- तसेच या मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करावं.
- त्यानंतर ताटाला थोडं तूप लावावं, यात हे मिश्रण व्यवस्थित पसरून ठेवावं.
- हा ट्रे फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावा. त्यानंतर या मिश्रणाचे चौकनी काप करावे आणि पिस्त्यांच्या काप्याने गार्निश करुन घ्यावा.
हेही वाचा :