बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना किंवा सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ‘रवा सॅन्डविच’ नक्की ट्राय करा.
साहित्य
- Advertisement -
- २ वाटी रवा
- १ शिमला मिर्च
- १ टोमॅटो बारीक चिरलेला
- १ कांदा बारीक चिरलेला
- हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीपूरते मीठ
- १ वाटी दही
- तेल
- ब्रेड
कृती
एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही मिसळा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्ची, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून त्यामध्ये कोथिंबीर घाला. आता या मिश्रणामध्ये उकळलेलं पाणी घाला आणि चांगले ढवळून घ्या. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावं. हे मिश्रण १० ते १५ मिनटे असेच राहू द्या. पॅनवर तेल घाला. आता ब्रेडच्या स्लाइसला या मिश्रणात बुडवून पॅनवर शेकण्यासाठी ठेवा. मंद आंचे वर ब्रेड दोन्ही बाजूने शेकून घ्या. ब्रेड तपकिरी रंगाची झाल्यावर गॅस वरून काढून घ्या. आता झटपट आणि चविष्ट रवा सॅन्डविच तयार. हे सँडविच सॉस बरोबर सर्व्ह करा.