घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात डोक्याच्या त्वचेवरील खाज (Itchy Scalp) ठरतेय डोकेदुखी

उन्हाळ्यात डोक्याच्या त्वचेवरील खाज (Itchy Scalp) ठरतेय डोकेदुखी

Subscribe

उन्हाळ्यात डोक्याच्या त्वचेवरील खाज (Itchy Scalp) त्रासदायक ठरते. मात्र ही खाज खशामुळे येते याची नेमकी कारणे काय आहेत. ते जाणून घेणार आहोत.

तुम्ही तुमच्या मित्रांसोबत असताना किंवा तुमच्या वरिष्ठांसोबत असताना डोक्याला खाज सुटली तर अवघड परिस्थिती होते. तुमच्या नकळत तुमचा हात डोके खाजविण्यासाठी गेला तर अजूनच खजील झाल्यासारखे होते. तसेच डोक्याला खाज येत असेल तर खूप अस्वस्थ वाटते. उन्हाळा असेल आणि तुम्हाला खूप घाम येत असेल तर डोक्याला खाज सुटण्याचे प्रमाण वाढते. कुणालाही डोक्याला आलेली खाज आवडत नाही पण अनेक कारणांमुळे, असे होऊ शकते. ती कारणे खालीलप्रमाणे आहेत.

संवेदनशील स्काल्प:

नैसर्गिकरित्या तुमची स्काल्प संवेदनशील असेल तर ती घट्ट आणि खाजरी वाटू शकते. चुकीचा आहार किंवा चुकीचा शॅम्पू वापरल्याने ही संवेदनशील होऊ सकते. यावर उपाययोजना करण्यासाठी तुम्हाला या संवेदनशीलतेचे कारण शोधून काढून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

अति उन्हाळा :

कडक उन्हाळा किंवा हिवाळा यामुळे देखील खाज सुटते. तसेच खूप वारा किंवा ऊन असेल तरीही तुमची स्काल्प कोरडी आणि खाजरी होऊ शकते.

कोरडी स्काल्प:

हायड्रेशनचा अभावतीव्र शॅम्पूंचा अति वापरअँटि डॅण्ड्रफ शॅम्पूस्मूथनिंगआयर्निंगसारख्या रासायनिक प्रक्रियांचे अति प्रमाणकेस ब्लो ड्रायिंगने वाळवणेतीव्र रंगांचा वापर करणे इत्यादी कारणांमुळे स्काल्प कोरडी होते. जेलवॅक्सफिक्सर्स इत्यादी स्काल्प कॉस्मेटिक्स चुकीच्या पद्धतीने काढणे यामुळे त्रास अधिक होतो.

- Advertisement -

मानसिक ताण :

शारीरिक आणि मानसिक ताणामुळे पुळ्या येतात. परिणामी खाज सुटते. तसेच स्काल्पला झालेली इजा, गरोदरपणामासिक पाळीस्टेरॉइड्स आणि रजोनिवृत्तीनंतर होणारे हॉर्मोन्समधील बदल. तसेच पदार्थांबद्दल असलेली अॅलर्जी यामुळे देखील डोक्याला खाज येते.

कोंडा किंवा सिबोऱ्हिक अॅक्झेमा :

कोंडा नक्की कशामुळे होते हे खरे तर कुणालाच माहीत नाहीपण स्काल्प खाजरी होण्यासाठी कोंडा किंवा सिबोऱ्हिक अॅक्झेमा हे मुख्य कारण आहे. कोंड्यामुळे तुमची स्काल्प खाजरी होतेचत्याचप्रमाणे केसांतून पडणारे पांढऱ्या रंगाचे कण खजील करतात.

सोरायसिस :

हा एक ऑटोइम्युन आजार आहे आणि त्यावर ताबडतोब उपचार करण्याची आवश्यकता असते. याचे सर्रास आढळणारे लक्षण म्हणजे तुम्हाला एकाच जागी खाज येते. फंगल इन्फेक्शनमुळे स्काल्पला होणारे टिनिया फंगल इन्फेक्शन्सहोते.

उन्हामुळे उठणारे पुरळ :

उन्हामुळे उठणारे पुरळ हे खाज येण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. अधिक काळ उन्हात राहिल्यास पुरळ उठतो.

कॉन्टॅक्ट डरमॅटिटीस:

स्काल्प असहनीय घटकाच्या संपर्कात आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते.

डोक्याला खाज येण्याकडे दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे खालील परिणाम होऊ शकतात.

  • स्काल्पवर चीर: जेव्हा तुम्ही स्काल्प खाजवता तेव्हा काही काळाने स्काल्पवर जखम होते.
  • केसगळती
  • त्वचेचा कर्करोग : हे अत्यंत टोकाच्या प्रकरणात उद्भवते पण तुमची त्वचेला पटकन अॅलर्जी होत असेल आणि अतिसंवेदनशील असेल तर तुम्ही अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

उपाय :

खाजऱ्या स्काल्पवर उपाय करण्यासाठी खाजरेपण मूळ धरण्याआधी आणि पसरण्याआधी खाजरेपण घालवून टाकणे हाच उपाय आहे. तुम्ही तुमच्या स्काल्पची आणि केसांची काळजी घेतली तर तुम्ही अधिक नुकसान होण्यापासून वाचवू शकता. तुम्ही सोप्या गोष्टी करून हे साध्य करू शकता

मसालेदार पदार्थ टाळा :

उन्हाळ्यात फार मसालेदार आहार घेऊ नका. मसालेदार पदार्थांमुळे ग्रंथी उद्दीपित होतात आणि तुमच्या केसांमध्ये अधिक घाम येऊ शकतोज्यामुळे उन्हाळ्यात खाज येण्याची समस्या वाढेल.

खाजवू नका:

हे कठीण आहे ते आम्हाला माहीत आहेपण जेव्हा खाज येईल तेव्हा खाजवू नकाकारण त्यामुळे समस्या अधिक गंभीर होईलखाज शमविणारी उत्पादने म्हणजेच अॅलो व्हेरा युक्त उत्पादने तुमच्या स्काल्पला लावा. त्याचप्रमाणे शॅम्पू केल्यानंतर तुमच्या केसांना पांढरे व्हिनेगार लावून केस धुवू शकता. त्यामुळे आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळतील.

चांगला अँटिडॅण्डरफ शॅम्पू वापरा:

अँटिडॅण्डरफ शॅम्पूमध्ये थंड करणारे आणि बरे करणारे मेन्थॉल आणि झिंक ऑक्साइडसारखे घटक असतात. त्यामुळे स्काल्पला थंडावा मिळतो आणि खाज येण्याला प्रतिबंध होतो आणि लवकर बरे होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या समस्येवर दुकानात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. तुमच्या स्काल्पला सुयोग्य असलेला अँटिडॅण्डरफ शॅम्पू सुचविण्यास तुमच्या डरमॅटोलॉजिस्टला सांगा.

तुमच्या केसांमधील मॉइश्चरायझर परत आणा:

जेल आणि सेरमसारखी केस मॉइश्चराइज करणारी उत्पादने वापरा. या उत्पादनांमुळे तुमची स्काल्प उन्हाळ्यातही थंड किंवा मॉइश्चराइज राहतील.

सूर्यकिरणांपासून संरक्षण करणारी उत्पादने वापरा:

तुमच्या स्काल्पला सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचविणे हे तुमेच उद्दिष्ट असावे. कारण या किरणांमुळे खाज येते. म्हणून सूर्यकिरणांपासून रक्षण करणारी उत्पादने वापरणे इष्ट ठरेल. तुम्ही सनस्क्रीन केसांमध्ये वापरू शकत नाहीहे आम्हाला माहीत आहे आणि यूव्ही किरणे तुमच्या केसांना आणि स्काल्पला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे यूव्ही प्रोटेक्शन स्प्रेचा वापर करा. हे स्प्रे केसांचे संरक्षण करतात आणि ते मलूलमेणचट किंवा तेलकट दिसत नाहीत.

बाहेर जाताना हॅट किंवा स्कार्फ घाला :

सूर्यकिरणे थेट तुमच्या स्काल्पपर्यंत पोहोचणार नाहीत त्यामुळे बाहेर जाताना हॅट किंवा स्कार्फ घाला

हायड्रेट :

उन्हाळ्यात खूप पाणी प्याविशेषत: तुम्ही बराच वेळ बाहेर असाल तर पाणी प्यायलेच पाहिजे. त्यामुळे तुमची स्कीन आतून थंड राहील.

कोमट पाण्याने अंघोळ करा :

अति गरम किंवा अति थंड पाण्याने अंघोळ केल्यास खाज वाढते. जर आधीच नुकसान झाले असेल तर आफ्टर द सन शॅम्पूवापरा.

दर दिवसाआड शॅम्पू:

दर दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू लावा आणि तुमची स्काल्प खूप तेलकट असेल तर उन्हाळ्यात रोज शॅम्पू लावा. त्यामुळे तुमच्या स्काल्पवर तेल आणि घाम साचणार नाही आणि तुमची स्काल्प आणि केस स्वच्छ राहतील.

(वरील माहिती डॉ. रिंकी कपूरकॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमेटोसर्जनद एस्थेटिक क्लिनिक्स यांनी दिली आहे. )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -