महाराष्ट्रात न्याहारीसाठी हा पदार्थ बनविला जातो. ब्रेड पोहे हा पोह्यांचा एक प्रकार आहे जो ब्रेड आणि काही मसाल्यांनी बनविला जातो. सकाळच्या न्याहारी किंवा संध्याकाळच्या चहासह देखील हा पदार्थ खाऊ शकता.
- Advertisement -
साहित्य-
२ चमचे तेल, १/८ टीस्पून हिंग, ५ ते ६ कढीपत्त्याचे पाने, २ चमचे लाल तिखट, १ वाटी वाटाणे (उकडलेले), भाजलेले शेंगदाणे, १ चमचा हळद, १ टीस्पून मीठ, ४ ब्रेडचे तुकडे, २ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून लिंबाचा रस, कोथिंबीर, किसलेले नारळ.
झटपट ब्रेड पोहे रेसिपी बनवण्याची कृती
- कढईत थोडे तेल टाकून गरम करून घ्यावे.
- तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि लाल तिखट घालावे.
- त्यात वाटाणे घालून ते शिजवून घ्यावे.
- त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे घालावे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यावे.
- हळद आणि मीठ टाकल्यानंतर ब्रेडचे तुकडे घालून ते चांगले फ्राय करावे.
- ब्रेडचे तुकडे घातल्यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडून घ्यावे.
- शेवटी त्यात हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर घालावी.
- पदार्थ तयार झाल्यावर किसलेले नारळ घालून झटपट ब्रेड पोहे सर्व्ह करावे.