उन्हाळ्यात नक्की करा ‘ट्रिपल मॉकटेल’

थंडगार 'ट्रिपल मॉकटेल'

Mumbai
recipe chilled mocktails for the summer
उन्हाळ्यात नक्की करा 'ट्रिपल मॉकटेल'

सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सातत्याने गारेगार खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही घरच्या घरी थंडगार असे ‘ट्रिपल मॉकटेल’ नक्की करु शकता. चला तर पाहुया ट्रिपल मॉकटेलची रेसिपी.

साहित्य

पायनॅपल ज्यूस ३ चमचे
शुगर सिरप २ चमचे
लिची क्रश ३ चमचे
बर्फाचे तुकडे आवश्यकतेनुसार
ऑरेंज ज्यूस ३ चमचे
लेमन ज्यूस १ चमचा
सोडा वॉटर आवश्यकतेनुसार

कृती

प्रथम एका शेक ग्लासमध्ये पायनॅपल ज्यूस, शुगर सिरप, लिची क्रश, ऑरेंज, लेमन ज्यूस आणि बर्फाचे तुकडे एकत्र करून चांगले शेक करून घ्या. शेक केल्यानंतर हे मिश्रण एका ग्लासमध्ये भरा. त्यावरून आवडीनुसार सोडा वॉटर टाका. ग्लासच्या वरच्या बाजूला पायनॅपलची एक स्लाइस लावून सर्व्ह करा.