चटपटीत गाजराचे लोणचे

गाजराचे लोणचे रेसिपी

Mumbai
recipe of spicy carrot pickle
चटपटीत गाजराचे लोणचे

उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गृहिणी घरच्या घरी लोणचे करतात. मात्र, बऱ्याचदा आंब्याचे, मिरचीचे लोणचे केले जाते. आज आम्ही तुम्हाला झटपट असे चटपटीत गाजराचे लोणचे कसे करायचे ते दाखवणार आहोत.

साहित्य

अर्धा किलो गाजरं
५० ग्रॅम कुठलाही तयार लोणचे मसाला
काश्मिरी लाल तिखट मसाला
२ मोठ्या लिंबांचा रस
२ चमचे मीठ
अर्धा चमचा हळद
१०० ग्रॅम तेल
५० ग्रॅम राई
पाव चमचा हिंग

कृती

सर्वप्रथम एका कढईत तेल घ्यावे. त्यानंतर तेल कडकडीत तापल्यावर त्यात राई आणि हिंग टाकून त्याची खमंग फोडणी तयार करा. नंतर ती थंड करायला ठेवा. दरम्यान गाजराचे चांगले बारीक तुकडे करून घ्या. त्यात लिंबाचा रस, मीठ, मसाला, हळद टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. मग त्यात थंड झालेली फोडणी टाकावी आणि परत एकदा मिश्रण चांगले एकजीव करून एका बरणीत भरून ठेवा, अशाप्रकारे झटपट घरच्या घरी गाजराचे लोणचे तयार.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here