घरलाईफस्टाईलपौष्टीक सोयाबीन नाचणी वड्या

पौष्टीक सोयाबीन नाचणी वड्या

Subscribe

नाचणीमध्ये कॅल्शिअम, आयर्न मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होणे, रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमान सुधारून अनिमिया होत नाही. तसेच नाचणीमधील फॉस्फोरस, पोटॅशिअम, यामुळे शरीरातील लिक्विड बँलन्स सांभाळले जाते. त्याचप्रमाणे नाचणीतील अँटी ऑक्सिडंट ने वार्धक्य दूर रहाते. तर सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. हारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. त्यामुळे नाचणी आणि सोयाबीनचे पौष्टिक घटकांचा एकाचवेळी स्वाद घेण्यासाठी नाचणी – सोयाबीनच्या वड्या अवश्य खा.

साहित्य:- १/२ कप नाचणीचे पीठ, १ कप सोयाबीनचे पीठ, १/२ कप तूप (थोडे जास्त लागू शकते) ,१/४ कप जाड पोहे , १/४ कप डिंक , १/४ कप जाड किसलेलं सुकं खोबरं (कोरडे भाजून), १/२ टिस्पून वेलची पावडर, ३/४ कप गूळ (बारीक किसलेला किंवा चिरलेला).

- Advertisement -

कृती:- कढईत तूप वितळवून घ्यावे. त्यात पोहे आणि डिंक वेगवेगळे तळून घ्यावे. एका ताटलीत काढून ठेवावे आणि थोडे चुरून घ्यावे एका ट्रेला तूप लावून तयार ठेवावा.त्याच तुपात नाचणीचे पीठ आणि कणिक मंद आचेवर भाजावी.तूप घालून सुद्धा पीठं कोरडी दिसत असतील तर तूप घालावे. किसलेला गूळ आणि २-३ टेस्पून पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गुळ वितळवून घ्यावा. ही कृती करताना सतत ढवळत राहावे. गूळ पूर्णतः वितळला की आच मोठी करून एक उकळी येऊ द्यावी.त्यात भाजलेली पीठे, डिंक, पोहे, भाजलेलं खोबरं, आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण ट्रेमध्ये ओतावे. हलक्या हाताने वड्या पाडाव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -