घरलाईफस्टाईलपोटाचा घेर कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

पोटाचा घेर कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

फिगरमध्ये राहायला प्रत्येक तरुणीला आवडते. याकरता प्रत्येक तरुणी प्रयत्न करत असते. जिम, योगा यासोबतच काही घरगुती उपाय केल्यास तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया काही घरगुती टीप्स.

सध्याचा काळ हा आधुनिक आहे. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. यामुळे आपली अंग मेहनत कमी झाली आहे. तसेच ऑफिसमध्ये देखील बसूनच काम असते. त्यातच बाहेरच्या जंक फूडचीही आहारात भर पडते. यामुळे बऱ्याचदा पोट सुटलेले दिसते. मात्र हा पोटाचा घेर सौंदर्यात बाधा आणतो. मात्र आपण घरगुती उपायांने पोटाचा घेर कमी करुन सुंदर दिसू शकतो. चला तर जाणून घेऊया पोटाचा घेर कमी करण्याचे घरगुती उपाय.

आलं

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आलं फार फायदेशीर ठरतं. आलं, तुळस आणि काळीमिरी एकत्र करुन याचा चहा घ्यावा. हा चहा उपाशी पोटी प्यावा. यामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

मध

पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी आलं, तुळस आणि काळीमिरी उकळून त्यात एक चमचा मध, लिंबू घालून ते पाणी प्यायल्याने चरबी वितळण्यास मदत होते.

काकडी

पोटाचा घेर कमी करण्यासाठी काकडी खूपच गुणकारी आहे. काकडी खाल्याने पोटाची चरबी कमी होते. याकरता जेवणापूर्वी एक ते दोन काकड्या खाल्ल्याने याचा फायदा होतो.

- Advertisement -

कोथिंबीर

पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोथिंबीर अत्यंत परिणामकारक ठरते. कोथिंबीरीच्या रसामध्ये अर्धा लिंबू रस आणि एकचमचा मध घालून याचे सेवन करावे. हा काढा रिकाम्या पोटी घ्यावा. यामुळे पोटाचा घेर कमी होतो.

जिरं

जेवणानंतर आपण बडिशेपचे सेवन करतो. मात्र त्यासोबत एक-एक चमचा जिरं, बडिशेप आणि ओवा याची पूड करुन याचे कोमट पाण्यासोबत सेवन कराव. यामुळे पोटाची चरबी वितळते.

कोरफड

कोरफड ही औषधी वनस्पती आहे. एक चमचा कोरफडीचा रस प्यायल्याने ओटीपोटाची चरबी कमी होते.

टोमॅटो

टोमॅटोच्या रसात कळीमिरीची पूड घालून हा तयार ज्यूस प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते. हा रस घेतल्याने अर्धा तास काहीच खाऊ नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -